दिल्लीमध्ये दिवाळीमुळे चार दिवस हिरवे फटाके वाजवण्यास सुप्रीम कोर्टाने परमीशन दिली (फोटो - सोशल मीडिया)
Delhi Fireworks permission : नवी दिल्ली : दिवाळी सणाच्या पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) येथील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे, सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे, न्यायालयाने फक्त NEERI (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) द्वारे प्रमाणित हिरव्या फटाक्यांच्या विक्री आणि वापराला परवानगी दिली आहे. परंतु या मान्यतेसह अनेक कठोर अटी देखील घालण्यात आल्या आहेत.
वायू प्रदूषणाच्या वाढत्या चिंतेमुळे दिल्लीत फटाक्यांवर आधीच बंदी घालण्यात आली असताना हा निर्णय आला आहे. पर्यावरणीय प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाचा हा आदेश जारी करण्यात आला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, हिरव्या फटाक्यांचा वापर आणि विक्री फक्त चार दिवसांसाठीच केली जाणार आहे. येत्या १८ ते २१ ऑक्टोबर या दिवशी दिवाळीच्या दरमन्यान केवळ फटाक्यांची विक्री केली जाईल हे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर इतर प्रकारच्या फटाक्यांवरील बंदी कायम राहील. या कालावधीनंतरही या फटाक्यांच्या विक्रीवरील बंदी कायम राहील आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा खंडपीठाने दिला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विक्री आणि खरेदीसाठी अनेक नियम
सुप्रीम न्यायालयाने हिरव्या फटाक्यांच्या विक्रीबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हिरव्या फटाके फक्त प्रमाणित कंपन्यांद्वारे नियुक्त केलेल्या ठिकाणीच विकले जाऊ शकतात. ग्राहकांच्या सोयीसाठी आणि प्रामाणिकपणा सुनिश्चित करण्यासाठी, सर्व हिरव्या फटाक्यांवर QR कोड अनिवार्य असतील, ज्यामुळे ग्राहकांना त्यांची प्रामाणिकता पडताळता येईल.
फटाके फोडण्यासाठी वेळेची मर्यादा
पर्यावरणाच्या चिंता लक्षात घेऊन, न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी कठोर वेळेची मर्यादा देखील निश्चित केली आहे. हिरवे फटाके आता फक्त दोन वेळेतच फोडता येतील. सकाळी ६ ते सकाळी ८ आणि रात्री ८ ते रात्री १० या चार तासांमध्येच फटाके फोडता येणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाने प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. पोलिस आणि प्रशासनाला देखरेख पथके तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पथकांचा प्राथमिक उद्देश हिरव्या फटाक्यांच्या निर्मिती आणि विक्रीवर बारकाईने लक्ष ठेवणे असेल. या आदेशानंतर, प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) हिरव्या फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर कडक लक्ष ठेवले जाईल.