राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा मतचोरीचा आरोप
Rahul Gandhi Accuse Election Commission of India: मागील काही महिन्यांपासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगावर सातत्याने मतदान चोरीचा आरोप करत आहेत. त्यावरून आतापर्यंत अनेकदा राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग, केंद्र सरकार असा वाद रंगला आहे. असे असतानाच राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. “निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षासाठी मतचोरी करत आहे. आपल्याकडे असलेले पुरावे अणुबॉम्बसारखे आहेत. ते समोर आल्यास निवडणूक आयोगाला तोंड लपवण्यासाठी जागा मिळणार नाही, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे.
संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘मते चोरीला जात आहेत, असे मी आधीच अनेक वेळा म्हटले आहे. पण आता आमच्याकडे याचे पूर्णपणे ठोस पुरावे आहेत. निवडणूक आयोग मत चोरीत सहभागी आहे आणि मी वरवर बोलत नाही, तर मी १०० टक्के पुराव्यांसह बोलत आहे.
आम्ही हे जाहीर करताच संपूर्ण देशाला कळेल की आयोग मते चोरत आहे. निवडणूक आयोग हे सर्व भाजपसाठी करत आहे. पण त्यानंतर निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही. आम्हाला मध्य प्रदेशात (विधानसभा निवडणुकीत) शंका होत्या, लोकसभा निवडणुकीतही शंका होत्या, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही अशाच पद्धतीने मतदार जोडण्यात आले. त्यानंतर आम्ही आमच्या बाजूने चौकशी सुरू केली आणि त्याला सहा महिने लागले. पण आम्हाला जे सापडले आहे ते अणुबॉम्बसारखे आहे, जेव्हा त्याचा स्फोट होईल तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोग कुठेही दिसणार नाही.
निवडणूक आयोगात असे काम जो कोणी करत आहे. त्याला आम्ही सोडणार नाही, तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, तुम्ही देशद्रोह करत आहात. तुम्ही निवृत्त झाले असाल किंवा कुठेही असाल,तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. तसेच, कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघात मतदार आम्ही मतदार याद्यांचे ऑडिट केले, त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याचा दावाही राहूल गांधी गेल्या काही दिवसांपूर्वी केला होता. या मतदार याद्यांचे ऑडित करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या असून त्याची माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला आहे.
२४ जुलै रोजी, निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. यावर निवडणूक आयोगानेही स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी यांनी निराधार आरोप केले असून एका संवैधानिक संस्थेला “धमकी” देण्याचा प्रयत्न केला आहे.
Rahul Gandhi, Election Commission of India, Madhya Pradesh Elections, Lokasabha Elections, Maharashtra Elections,