काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज ईडीसमोर हजर राहणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता ते ईडीसमोर आपला जबाब नोंदवणार आहे. सोनिया गांधी यांनाही ईडीनं समन्स बजावलं आहे. पण, कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी मुदत वाढवून मागितली आहे.
[read_also content=”सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शार्पशूटर संतोष जाधवला पुणे पोलिसांनी गुजरातमधून घेतलं ताब्यात https://www.navarashtra.com/maharashtra/sharpshooter-santosh-jadhav-is-arrested-by-pune-police-from-gujarat-nrps-291864.html”]
राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. परंतु, दिल्ली पोलिसांनी मार्चाला परवानगी नाकारली आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यास परवानगी दिली नाही. केंद्र सरकार तपास यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं 13 जून रोजी राहुल गांधी ज्यावेळी ईडी आणि दिल्लीतील तपास यंत्रणांसमोर हजर होतील, त्यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि इतर कार्यकर्त्यांसह ईडी कार्यालयाबाहेर ‘सत्याग्रह’ करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावल्या प्रकरणी काँग्रेसनं देशव्यापी सत्याग्रहाची घोषणा केली होती.