जालंधर : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या चर्चेत असलेल्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) गालबोट लागलं आहे. ही यात्रा सध्या पंजाबमध्ये असून शुक्रवारी यात्रा जालंधरवरुन निघाली. याच काळात काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी हे बेशुद्ध झाल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हार्ट अटॅकनं त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. या मोठ्या घटनेनंतंर काही काळासाठी भारत जोडो यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
चालता चालताच मृत्यूनं गाठलं
पंजाबच्या जालंधरचे खासदार असलेले चौधरी संतोखसिंह हे लुधियानात यात्रेसाठी पोहचले होते. राहुल गांधी यांच्यासोबत ते यात्रेत चालत होते. चालता चालताच अचानक त्यांच्या ह्रद्यात दुखू लागलं. खूप घाम आला. त्यानंतर तिथं गोंधळ उडाला. याच गोँधळात संतोखसिंह यांना फगवाडाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय.
कोण होते संतोखसिंह चौधरी?
संतोओखसिंह यांचा जन्म १८ जून १९४६ साली झाला होता. ते पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि जालधंर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. २०१४ आणि २०१९ साली मोदींच्या लाटेतही त्यांनी जालंधरमधून विजय मिळवला होता. संतोखसिंह याांच्या निधनानंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून काही काळासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.