Rahul Gandhi Bihar: बिहारमध्ये राहुल गांधीचे 'देसी पॉलिटिक्स'; काँग्रेसचा ३५ वर्षांचा वनवास संपणार का?
स्वातंत्र्यापासून 1980 च्या अखेरपर्यंत बिहारच्या राजकारणत काँग्रेसचे वर्चस्व होते, परंतु मंडल राजकारणाच्या राजकीय उदयानंतर काँग्रेस सत्तेतून बाहेर होती. पण आता साडेतीन दशकांनंतर काँग्रेस आपला गमावलेला पाठिंबा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव बिहारमधून मतदार अधिकार यात्रा काढत आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधीं, प्रियांका गांधींयांच्यापासून अगदी दक्षिणेकडील नेतेही या यात्रेत दिसत आहेत.
आजकाल राहुल गांधी ‘मतदार अधिकार यात्रे’च्या माध्यमातून तेजस्वी यादव यांच्यासोबत बिहारच्या रस्त्यांवर फिरत आहेत. राहुल गांधी बिहारमध्ये पूर्णपणे देशी पद्धतीने जनतेत जाऊन, त्यांच्या समस्या ऐकताना दिसत आहे. या प्रवासादरम्यान राहुल गांधी कधी बुलेटवर स्वार झालेले दिसत आहेत, तर कधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधताना, त्यांच्या अडचणी ऐकत आहेत. तर कधी गळ्यात टॉवेल घालून देसी शैलीत बिहारच्या लोकांना आकर्षित करताना दिसत आहेत.
बिहारमध्ये, राहुल गांधी वेगळ्या शैलीत आणि वृत्तीने लोकांशी संबंध जोडत आहेत, ज्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह भरला आहे. या सगळ्यातराहुल गांधी १६ दिवसांच्या ‘मतदार हक्क यात्रे’च्या माध्यमातून बिहारमधील काँग्रेसचा ३५ वर्षांचा राजकीय वनवास संपवण्यात यशस्वी होतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Maratha Reservation : राज्य सरकारने अखेर जीआर काढलाच; मराठा समाजाला आता ‘हा’ होणार मोठा फायदा
राहुल गांधी यांनी १७ ऑगस्ट रोजी बिहारमधील सासाराम येथून १६ दिवसांच्या ‘मतदार हक्क यात्रे’ला सुरुवात केली. ही यात्रा १ सप्टेंबर रोजी बिहारची राजधानी असलेल्या पटना याठिकाणी संपणार आहे. राहुल गांधींच्या यात्रेचा ताफा त्याच्या निश्चित स्थानाकडे जात असताना, राहुल गांधी सध्या बिहारच्या बिहारच्या रंगात रंगून गेल्याचे दिसत आहे. राहुल यांनी त्यांच्या दोन आठवड्यांच्या प्रवासात लोकांची मने जिंकण्यासाठी पूर्णपणे देसी शैली आणि लूक स्वीकारला. इतकेच नाही तर राहुल गांधी अशा अनेक लोकांना त्यांच्या मंचावर बोलावून त्यांना संबोधित करताना दिसत आहेत, ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
राहुल गांधी-तेजस्वी यादव यांचे भाषण ऐकणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राहुल गांधींनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे. हातात तिरंगा आणि पक्षाचा झेंडा धरून, काँग्रेस कार्यकर्ते उन्हात आणि दमट वातावरणातही राहुल गांधींसोबत चालत आहेत. यासोबतच पक्षाचे कार्यकर्ते ‘वोट चोर गद्दी छोड’ अशा घोषणा देत राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणा देताना दिसत आहे. अशाप्रकारे, बिहारचे राजकीय वातावरण पूर्णपणे काँग्रेसप्रधान झाले आहे.
फेस्टिव्हल सीझनमध्ये धमाका, GST मध्ये बदल आणि देशांतर्गत मागणी वाढल्याने अर्थव्यवस्थेला मिळणार गती
स्वातंत्र्यापासून १९८० च्या दशकापर्यंत बिहारमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते, पण त्यानंतर काँग्रेस बिहारच्या सत्तेतून बाहेर पडली आणि संपूर्ण राजकारणच बदलून गेले. सत्तेबाहेर राहिल्यामुळे काँग्रेस अधिकच कमकुवत होत गेली गेल्या तीन लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून बिहारमधील काँग्रेसची स्थिती खूपच कमकूवत होती.
गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहता, काँग्रेस बिहारमध्ये कोणतेही चमत्कार करू शकली नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बिहारमध्ये २ जागा जिंकल्या आणि मतांचा वाटा ८.६ टक्के होता. २०१९ मध्ये काँग्रेस फक्त १ जागेवर आली आणि मतांचा वाटा ७.९ टक्के झाला. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’नंतरही काँग्रेसने बिहारमध्ये विशेष प्रभाव दाखवला नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३ जागा जिंकल्या आणि मतांचा वाटा ९.४ टक्के होता. अशाप्रकारे, बिहारमध्ये आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी काँग्रेस राजदचा आधार बनून राहिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दलितांचा बालेकिल्ला असलेल्या सासाराम जिल्ह्यातून ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू केली आहे. या प्रदेशातून बाबू जगजीवन राम आणि नंतर त्यांची मुलगी मीरा कुमार खासदार म्हणून निवडून आल्या. मुस्लिमांप्रमाणेच दलित ही बिहारमध्ये काँग्रेसची मोठी मतपेढी राहिली आहे. प्रियांका गांधी यांनीही मिथिला प्रदेशात राहुल यांच्यासोबत निवडणूक लढवली.
मिथिला प्रदेश हा परंपरेनुसार ब्राह्मणबहुल मानला जातो. काँग्रेसच्या काळात बिहारच्या राजकारणात ब्राह्मणांचे वर्चस्व होते, विशेषतः मिथिला प्रदेशात, मग ते जगन्नाथ मिश्रा असोत किंवा भागवत आझाद झा असोत. काँग्रेस सत्तेबाहेर गेल्यानंतर या प्रदेशातून कोणताही ब्राह्मण मुख्यमंत्री होऊ शकला नाही. अशा प्रकारे काँग्रेस आता त्यांच्या पारंपरिक ब्राह्मण मतपेढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.
राहुल गांधींच्या यात्रेने दलित, मागास आणि अल्पसंख्याक मतदारांना एकत्र केले आहे. काँग्रेसचा दावा आहे की मतदार यादीतून ६५ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यापैकी बहुतेक गरीब आणि दलित आहेत. हा मुद्दा भाजपच्या मतपेढीवर, विशेषतः ग्रामीण आणि तरुण मतदारांवर परिणाम करू शकतो.
त्याउलट, भाजपने नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदींचे विकास मॉडेल पुढे आणले आहे. तरीही, राहुल यांच्या भेटीने त्यांच्या हिंदुत्व कार्डलाही आव्हान दिले आहे, विशेषतः प्रियांकाच्या जानकी मंदिर पूजेनंतर. या भेटीमुळे राजकीय समीकरण बदलले असून, काँग्रेस बिहारमध्ये आपले जुने स्थान परत मिळवू शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
BIGG BOSS 19 : सलमान आज कोणात्या स्पर्धकांची घेणार शाळा? तान्याची स्तुती तर मृदुलची उडवली खिल्ली
राहुल गांधींना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच बिहारमधील काँग्रेसची परिस्थिती समजली होती, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये काँग्रेसला फक्त ३ जागा मिळाल्या होत्या. तेव्हापासून राहुल यांनी राजकीय सराव सुरू केला. राहुल गांधींनी स्वतः एकामागून एक सतत दौरे सुरू केले. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय जनता दलाशी युती करून काँग्रेसला बळकटी देण्याची योजना आखली.ज्याचा फायदा राज्यालाही होईल.
बिहारच्या २०२५ च्या विधानसभा निवडणुकांची अद्याप घोषणा झाली नसली तरी, काँग्रेसने बिहारमधील अध्यक्षही बदलले आहेत. भूमिहार समाजातून येणारे अखिलेश प्रसाद यांना पदावरून हटवून दलित समाजातील राजेश राम यांच्याकडे बिहारचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले. राहुल यांनी त्यांचे जवळचे सहकारी कृष्णा अल्लावरू यांना बिहारचे प्रभारीपद दिले, तर सुशील पासी यांना सह-प्रभारी केले. याशिवाय शाहनवाज आलम यांनाही सह-प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. याशिवाय कन्हैया कुमार आणि पप्पू यादव यांना सक्रिय करून राजकारणही तापवले. यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी स्वत: बिहारच्या रणांगणात उतरले आहेत.
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’नंतर ‘मतदार हक्क यात्रे’बाबत राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच उत्साह दिसून येत आहे आणि गर्दीही जमू लागली आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या दौऱ्याचा बिहार विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, काँग्रेस बिहारमधील तिचा ३५ वर्षांचा राजकीय वनवास संपवू शकेल का, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल, पण राहुल गांधी यांनी बिहारच्या राजकारणात निश्चितच खळबळ उडवून दिली आहे. या गोंधळामुळे भाजप आणि जेडीयू मात्र चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.