त्वचेचे सौंदर्य आणखीनच सुंदर आणि खुलून दिसण्यासाठी सर्वच महिला, मुली मेकअप करतात. मेकअप करण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर केला जातो. त्यातील अतिशय महत्वाची गोष्टी म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. काहींना नेहमीच लिपस्टिक लावण्याची सवय असते. पण हानिकारक रसायांपासून बनवण्यात आलेली लिपस्टिक ओठांसह संपूर्ण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दररोज लिपस्टिक लावल्यामुळे शरीराला नेमके काय तोटे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सावधान! नियमित लिपस्टिक लावणे ओठांसह संपूर्ण आरोग्यासाठी ठरेल धोक्याचे
नियमित लिपस्टिक लावल्यामुळे ओठांवर काळेपणा वाढतो. याशिवाय ओठ अतिशय कोरडे होतात. लिपस्टिकमध्ये असलेले हानिकारक रसायने ओठांना हानी पोहचवतात.
अनेक लिपस्टिकमध्ये काचेचे तुकडे आढळून येतात. हे काचेचे तुकडे हळूहळू शरीरात जमा होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे हार्मोनल असंतुलन आणि प्रजनन समस्या उद्भवू शकतात.
लिपस्टिक तयार करताना वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे काहीवेळा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. नियमित लिपस्टिक लावल्यामुळे ओठांचा रंग फिकट होतो.
लिपस्टिकमध्ये पॅराबेन्स, कॅडमियम आणि क्रोमियम इत्यादी विषारी रसायन आढळून येतात. ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींना चालना मिळते. शरीरात हळूहळू कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात.
दररोज लिपस्टिक लावल्यामुळे ती खाताना किंवा पिताना सहज तोंडात जाते. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. यकृत आणि पोटाचे नुकसान होऊन आरोग्य बिघडते.