दरभंगा येथे काँग्रेसच्या मंचावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ झाल्याचा प्रकार झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
PM modi abused in darbhanga : बिहार : बिहारमध्ये लवकरच निवडणूक होणार असल्यामुळे जोरदार राजकारण तापले आहे. कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बिहारमध्ये यात्रा पार पडत आहे. बिहारमधील दरभंगा येथे काँग्रेसच्या ‘मतदार अधिकार यात्रे’ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल वापरल्या गेलेल्या अपशब्दांवरुन राजकारण तापले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून
दरभंगा शहरातील यात्रेदरम्यान उभारलेल्या व्यासपीठावरून एका व्यक्तीने मंचावरुन घोषणाबाजी केली. माईकवरुन घोषणा देताना सदर व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध हिंदीत अपशब्द वापरले आहेत. त्यांच्या आईवर शिवीगाळ करत घोषणा दिल्या आहेत. यावेळी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतलेले अनेक समर्थक हे खाली उभे राहिले असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून, मोहम्मद रिझवी उर्फ रझा (२०) याला दरभंगा शहरातील सिंघवाडा परिसरातून अटक करण्यात आली. भाजपचे दरभंगा जिल्हाध्यक्ष आदित्य नारायण चौधरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्याच्या आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बिहार के दरभंगा में महागठबंधन के मंच से प्रधानमंत्री मोदी को माँ की गाली दी गई…
प्रधानमंत्री के प्रति कांग्रेस और RJD की नफ़रत जग जाहिर है। राहुल गांधी और तेजस्वी द्वारा मंच से कई बार प्रधानमंत्री के लिए बदजुबानी की गई है। ऐसे में नीचता की हद तब पार हो गई जब दरभंगा में वोट चोरी… pic.twitter.com/zBZ5U9UThw
— Nishant Azad/निशांत आज़ाद🇮🇳 (@azad_nishant) August 27, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केल्यामुळे भाजप नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी पटनामधील सदाकत आश्रमावर हल्ला केला, ते राज्य काँग्रेस कार्यालय आहे. यादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये कार्यकर्ते एकमेकांवर जीवघेणा हल्ला करत होते. झेंड्याच्या काठ्यांनी भाजप आणि कॉंग्रेस नेते हे एकमेकांवर हल्ला करत होते. त्याचबरोबर घटनास्थळी विटा आणि दगडफेकही करण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यावरुन आता बिहारचे राजकारण तापले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॉंग्रेसच्या मंचावरुन अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुवाहटी येथील सभेमधून अमित शाह यांनी राहुल गांधी यांना माफी मागा असा इशारा दिला आहे. अमित शाह म्हणाले की, “जर राहुल गांधींना थोडीही लाज राहिली असेल तर त्यांनी माफी मागावी. देश त्यांना आणि त्यांच्या पक्षाला तिरस्काराने पाहत आहे. घुसपेटीया बचाव यात्रा काँग्रेसच्या मतपेढीचे रक्षण करण्यासाठी आहे, परंतु कोणत्याही लोकशाहीमध्ये निवडणूक हा त्याचा आत्मा आहे. जर घुसखोरांना व्यवस्थेला प्रदूषित करण्याची परवानगी दिली तर देश कसा सुरक्षित राहू शकेल?” असा सवाल अमित शाह यांनी केला.