CJI Bhushan Gavai Attack news Update: गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर एका ज्येष्ठ वकिलाने बूट फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राकेश किशोर असे हल्ला करण्याऱ्या वकिलाचे नाव आहे. या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वकील राकेश किशोर यांच्याविरूद्ध फौजदारी अवमानना कारवाई करण्यात येणार आहे. भारताचे अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी राकेश किशोर यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना कारवाई सुरू करण्यास संमती दिली आहे.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला माहिती दिली आहे. भारताचे अॅटर्नी जनरल यांनी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांच्याविरुद्ध फौजदारी अवमान कारवाई सुरू करण्यास संमती दिली आहे.
उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन, पण युतीची घोषणा कधी? संजय राऊत स्पष्टच बोलले
एससीबीए अध्यक्ष विकास सिंह यांना लिहिलेल्या पत्रात अॅटर्नी जनरल यांनी या प्रकारचा पूर्णपणे निषेध केला आहे. ‘राकेश किशोर यांच्या “कृती आणि विधाने केवळ निषेधार्ह नाहीत तर सर्वोच्च न्यायालयाच्या वैभवाला आणि अधिकारालाही कमी करणारे आहे. राकेश किशोर यांचे वर्तन “न्याय वितरण व्यवस्थेच्या पायावर आघात करणार आहे.” असही आर. वेंकटरमणी यांनी म्हटले आहे.
पण त्याचवेळी भूषण गवई यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे वर्णन ‘विसरलेला अध्याय’ म्हणून केले. सर्वोच्च न्यायालयात बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, “सोमवारी घडलेल्या घटनेने मी आणि माझे विद्वान बांधव खूप हादरले आहेत. हा आमच्यासाठी विसरलेला अध्याय आहे.”
भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान हे देखील तिथे उपस्थित होते, त्यांनीही या प्रकारावर टिका केली आहे. “यावर माझे स्वतःचे मत आहे. ते भारताचे मुख्य न्यायाधीश आहे. हा विनोद नाही. गेल्या काही वर्षांत, न्यायाधीश म्हणून, आम्ही अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्या इतरांना योग्य वाटणार नाहीत, परंतु त्यामुळे आम्ही जे केले त्याबद्दल आमचे मत बदलत नाही.”
यादीवर मोठी शंका, विधानसभा निवडणुकीत शेवटच्या चार दिवसात…; काँग्रेसच्या नेत्याचा सवाल
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, “भूषण गवईंवर होणारा हल्ला ही अक्षम्य घटना होती आणि या घटनेचा विचार करण्यात मुख्य न्यायाधीशांची महानता आणि उदारता दिसून येते.”
६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याची प्रकार घडला. राकेश किशोर नावाच्या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्तान’ अशी नारेबाजीही त्यांनी केल. त्यांनी केलेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्यास किंवा या प्रकाराचा पश्चाताप नसल्याचेही स्पष्ट केले. पण या सर्व प्रकारादरम्यान मात्र सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शांत राहणे पसंत केले आणि कामकाजही सुरू ठेवले. “अशा गोष्टींमुळे प्रभावित होणारा मी शेवटचा व्यक्ती आहे. या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आम्ही विचलित नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.” असंही भूषण गवईंनी स्पष्ट केले.
तथापि, या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने औपचारिक तक्रार दाखल केली नाही. सरन्यायाधीश गवई यांनी रजिस्ट्रीला त्या व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करू नये असे सांगितले. तरीही, दिल्ली पोलिसांनी राकेश किशोर यांची न्यायालयाच्या आवारात अनेक तास चौकशी केली आणि नंतर त्यांना सोडून दिले. नंतर त्यांचे बूट परत करण्यात आले.