नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून देशात थंडी वाढायला सुरुवात झाली. सद्या उत्तर भारतात थंडीनं कहर केला आहे. उत्तरेकडील राज्यातील तापमानात कमालीच घट पाहायला मिळत आहे. वाढती थंडी पाहता दिल्लीसह पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
[read_also content=”सर्वसामान्यांना शॉक! राज्यात पुन्हा एकदा वीजदर वाढणार? प्रति युनिट २ रुपये ३५ पैसे दरवाढीची शक्यता…वीजवाढीचे कारण माहितेय? https://www.navarashtra.com/maharashtra/shock-to-the-general-public-electricity-rate-will-increase-in-the-state-again-possibility-some-paise-price-increase-per-unit-360242.html”]
काही दिवसापासून देशातील तापमानात (temperature) कमालीची घट झाल्याच दिसत आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. वर्षाच्या सुरुवाती पासूनच राजधानी दिल्लीतील तापमान कमी झाल्यामुळे थंडी वाढल्याच पाहायला मिळत आहे. दिल्लीती सफदरगंज परिसरामध्ये 1.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे. तर, उत्तरेकडील राज्यातही तापमानत घट झाली आहे. राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.