army man

जम्मू- काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील (Samba Attack) रामगढ सेक्टरमध्ये सीमेवर पाकिस्तानने केलेल्या बेछूट गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद (BSF Jawan Martyr) झाला. पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला असून, बीएसएफने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

    श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील (Samba Attack) रामगढ सेक्टरमध्ये सीमेवर पाकिस्तानने केलेल्या बेछूट गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद (BSF Jawan Martyr) झाला. पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला असून, बीएसएफने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

    बीएसएफने निवेदनात म्हटले आहे की, 8-9 नोव्हेंबरच्या मध्यरात्री, पाकिस्तान सैन्याने रामगढ भागात विनाकारण बेछूट गोळीबार केला. बीएसएफ जवानांनी पाकला प्रत्युत्तर दिले. यामध्ये बीएसएफचा जवान जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लाल फर्न किमा असे जवानाचे नाव आहे. तीन आठवड्यातील तिसरी घटना तीन आठवड्यांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही तिसरी वेळ आहे.

    17 ऑक्टोबर रोजी पाक रेंजर्सनी पहिला गोळीबार केला होता. यामध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. त्याचवेळी, 26 ऑक्टोबरला दुसऱ्यांदा जम्मूच्या अरनिया आणि सुचेतगड सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात बीएसएफ जवान आणि एक महिला जखमी झाली.

    शोपियानमध्ये एक दहशतवादी ठार

    जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. ही चकमक रात्री शोपियान जिल्ह्यातील काटोहलन भागात झाली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रांसह अन्य साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी मृत दहशतवाद्याची ओळख मेसर अहमद दार अशी केली असून, तो अलीकडेच लष्कर प्रॉक्सी टीआरएफमध्ये सामील झाला होता.