Sania Mirza Reaction On Indian Army Amid Tention With Pakistan
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ७ मेच्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराने पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त कश्मिरातील ९ दहशतवादी तळ नेस्तनाभूत केले होते. त्यानंतर पाकिस्तान सैन्याकडून दररोज रात्री पाकिस्तान लगतच्या सीमा शेजारील भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ते हल्ले हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर देखील दिले. हल्ले आणि प्रतिहल्ल्यामुळे भारत- पाकिस्तान बॉर्डरवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, काल अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीमुळे भारत- पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.
त्यानंतर भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्ट शेअर करत देवाचे आभार मानले असून तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिला आहे.
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिला आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सानिया मिर्झा म्हणते, “मुत्सद्देगिरी (Diplomacy) हा कमकुवतपणा नाही, युद्ध नव्हे तर संवाद आणि शांती हाच एकमेव पर्याय आहे, त्याची निवड करावी. कारण, तोच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. संघर्ष वाढत गेल्यावर काय होतं हे आपण गाझापासून इस्रायलपर्यंत, पुलवामापासून पहलगामपर्यंत, रशियापासून युक्रेनपर्यंत पाहिलं आहे. झेंडे जरी वेगळे असले तरी दु:ख हे मात्र सारखंच दिसतं” या वाक्यांतून तिने युद्धाच्या वेदना कोणत्याही देशात सारख्याच असतात, हे अधोरेखित केलं आहे.
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच, युद्धबंदीदरम्यान भारतीय हवाई दलाचं मोठं विधान
तर आणखी एक सानियाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये सानियाने भारताने पाकिस्तानसोबत युद्धबंदी केली आहे, असं म्हटलं आहे. तिने शेअर केलेली ही बातमी ‘इंडिया टुडे’ या इंग्रजी वृत्तसंस्थेची आहे. सानियाची इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकदरम्यान तणाव वाढलेला असताना सानियाने संयमित आणि मानवतेचा विचार अनेकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. सानिया मिर्झा ही भारतीय टेनिसमध्ये महत्त्वाची ओळख असून ती पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकची घटस्फोटीत पत्नी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक वक्तव्याकडे दोन्ही देशांमध्ये लक्ष दिलं जातं. युद्ध नव्हे, संवाद आणि समजूतदारपणा हाच खरा मार्ग आहे, हे सानियाने पुन्हा एकदा आपल्या शब्दांतून मांडलं आहे.