'योग्य भूमिका घ्या, अजूनही वेळ गेली नाही'; इस्रायल-इराण युद्धावरून सोनिया गांधींनी मोदी सरकारला फटकारलं
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. इस्रायलने इराणी भूमीवर केलेल्या लष्करी कारवाईला बेकायदेशीर आणि सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सकरारचं मौन केवळ राजनैतिक चूक नाही तर आपल्या नैतिक आणि धोरणात्मक परंपरांपासून दूर जाणं देखील दर्शवत असल्याचं म्हटलं आहे.
Election Commission of India: निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय काय? आता EVM तपासणीच्या नियमातही बदल
१३ जून रोजी इस्रायलने इराणी लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्याला धोकादायक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. या कारवाईमुळे पश्चिम आशियात अशांतता आणखी वाढेल आणि त्याचे प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भारताचे इराण आणि इस्रायल या दोघांशी ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंध आहेत. १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगात काश्मीर मुद्द्यावर भारताविरुद्धचा ठराव थांबविण्यास इराणने मदत केली तेव्हा त्यांनी इराणच्या पाठिंब्याची आठवण करून दिली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधला. ट्रम्पवर यांनी त्यांच्या गुप्तचर संस्थांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून आक्रमक धोरण स्वीकारल्याचा आरोप केला. शिवाय इतिहास आपल्याला आठवण करून देतो की नेतन्याहू यांनी द्वेषाची आग पेटवण्यास मदत केली, ज्याचा शेवट १९९५ मध्ये पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्या हत्येत झाला, ज्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टिनींमधील शांततेसाठी सर्वात आशादायक वाटणारा उपक्रम संपुष्टात आला.
२०१८ मध्ये अमेरिकेने अणुकरारातून (JCPOA) माघार घेतल्याने केवळ बहुपक्षीय राजनैतिक संबंधाचंच नुकसान झालं नाही तर चाबहार बंदर आणि उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर सारख्या भारतासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांवरही परिणाम झाला. त्यांनी सांगितले की गाझामध्ये ५५,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, कुटुंबे आणि परिसर उद्ध्वस्त झाले आहेत आणि संपूर्ण परिसर दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.
Election Commission Of India: ‘तो’ एक लेख अन…; निवडणूक आयोग राहुल गांधीच्या जाळ्यात ?
सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला भारताच्या पारंपारिक शांतता आणि संवाद धोरणाकडे परतण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की भारताने आपला मुद्दा स्पष्ट आवाजात मांडावा आणि प्रत्येक राजनैतिक माध्यमाचा वापर करून पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.