Photo credit- Social Mediaसर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातील रोख रकमेचा व्हिडिओसर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातील रोख रकमेचा व्हिडिओ आसर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातील रोख रकमेचा व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रकाशित छायाचित्रे प्रकाशितआणि छायाचित्रे प्रकाशित
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी लागलेलया आगीत पैशाचे मोठे घबाड आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी अभूतपूर्व निर्णय घेत, सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी आपल्या संकेतस्थळावर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी बेहिशोबी रोकड सापडल्याच्या आरोपांशी संबंधित अहवाल आणि दस्तऐवज, तसेच छायाचित्रे आणि व्हिडिओ अपलोड केले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा चौकशी अहवाल आणि न्यायमूर्ती वर्मा यांचे प्रत्युत्तर सार्वजनिक करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनी पुरवलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली आहेत. हे छायाचित्रे आणि व्हिडिओ १४ मार्च रोजी न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीच्या विझवण्याच्या कारवाईशी संबंधित आहेत, त्या वेळी ते घरी उपस्थित नव्हते.
न्यायव्यवस्थेत भूकंप! उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या घरात
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी सादर केलेल्या अहवालानुसार, ही घटना १४ मार्च रोजी न्यायमूर्ती वर्मा यांच्या शासकीय बंगल्यातील एका स्टोअररूममध्ये घडली. या ठिकाणी घरातील व्यक्तींव्यतिरीक्त इतर कुणालाही प्रवेश नव्हता.मुख्य न्यायाधीश उपाध्याय यांना दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी १५ मार्च रोजी संध्याकाळी सुमारे ४:५० वाजता या घटनेची माहिती दिली. त्यानुसार, १४ मार्च रोजी रात्री ११:३० वाजता न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागली होती.
न्यायमूर्ती वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात आग लागली त्यावेळी ते शहराबाहेर होते. न्यायाधीशांच्या पीएसने पीसीआरला बोलवले. यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली पण या दरम्यान पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बंगल्यात नोटांचा मोठा ढीग सापडला. हा ढीग अर्धा जळून राख झाला होता. हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
RSS For BJP: बिहार, बंगालच्या विजयासाठी बंगळुरूत मोठी खलबतं;
या प्रकरणात कारवाई करत, भारताच्या सरन्यायाधीशांनी ताबडतोब सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची बैठक बोलावली ज्यामध्ये न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह, सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या पातळीवर या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आतापर्यंतच्या तपासात जे काही समोर आले आहे ते सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक केले आहे. यामध्ये नोटांच्या ढिगाऱ्याचा अर्धा जळालेला फोटो देखील आहे.
दुसरीकडे, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीके उपाध्याय यांना प्राथमिक चौकशी करण्यास सांगितले होते. त्यांच्या पत्रात डीके उपाध्याय यांनी या प्रकरणात ‘सखोल चौकशी’ आवश्यक असल्याची माहिती मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांना दिली आहे. तर त्याच वेळी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कधीही स्टोअर रूममध्ये रोख रक्कम ठेवली नाही. त्यांच्याविरुद्ध कट रचला जात असल्याचा दावा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी केला आहे.