उत्तरकाशी: उत्तराखंडमधील बोगदा दुर्घटनेतील (Uttarakhand Tunnel Collapse) सर्व ४१ कामगार सुखरूप असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत (Christmas) प्रतीक्षा करावी लागणार आहे. 800 मि.मी.चा लोखंडी पाईप ड्रिलिंग करून टाकणाऱ्या ऑगर मशीनचे ब्लेड शनिवारी ढिगाऱ्यात अडकले. त्यामुळे मशीनची निकामी झाली आहे, त्यामुळे आता बोगद्यात वरून खोदकाम करून मार्ग तयार केला जात आहे. यामुळे कामगारांना वाचवण्यासाठी 13 दिवस ते काही आठवडे लागू शकतात.
[read_also content=”केरळमध्ये विद्यापीठात मोठी दुर्घटना, म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना चेंगराचेंगरी, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/india/4-students-dead-in-stampede-during-concert-at-kerala-university-483820.html”]
बचाव कार्य अधिकारी आता उरलेल्या 10 किंवा 12 मीटरच्या ढिगाऱ्यात मॅन्युअल ड्रिलिंग करणार किंवा वरपासून 86 मीटर खाली ड्रिलिंग करणार. मात्र, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे ( सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी म्हटले आहे की या ऑपरेशनला बराच वेळ लागू शकतो. तर, आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनीही “ख्रिसमसपर्यंत” कामगारांना बाहेर काढलं जाऊ शकतं असं म्हण्टलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बचाव कार्यादरम्यान शुक्रवारी खोदकामादरम्यान औगर मशीन तुटली. आहे. शनिवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेला ऑगर मशीनचा भाग काढण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा कटर विमानाने आणले जात आहे. ऑगर मशीनने भाग काढणे सुरू केल्यानंतर, मॅन्युअल ड्रिलिंग सुरू होईल. दुसरीकडे, बोगद्यापर्यंत जाण्यासाठी, वरपासून खालपर्यंत खोदण्यासाठी अवजड यंत्रांचा वापर केला जात आहे. शनिवारी त्याला खोदकामाच्या ठिकाणी नेण्यात आले. लवकरच उत्खनन सुरू होईल. यामध्ये कोणतेही अडथळे न आल्यास उत्खनन वेगाने करून कामगारांना लवकर बाहेर काढण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून आवश्यक बचाव उपकरणे आणि संसाधने पुरविली जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संस्थांच्या परस्पर समन्वयाने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. सध्या घटनास्थळी चोवीस तास बचावकार्य सुरू आहे.