नवी दिल्ली – कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे कारण देत कोर्टात लवकर सुनावणीची मागणी केली होती. बुधवारी न्यायमूर्ती एनव्ही रमणा आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने वकिलांच्या युक्तिवादाची दखल घेतली. याचिका 15 मार्च रोजी दाखल करण्यात आली होती, त्याला बराच काळ लोटला आहे. यावर अद्याप कोणतीही सुनावणी झालेली नाही. त्यामुळे पुढील आठवड्यातच सुनावणी होणार आहे, असे खंडपीठाने म्हटले.
या वर्षी मार्चमध्ये उच्च न्यायालयाने कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याबाबत निर्णय दिला होता. मुस्लिम मुलींसह इतर लोकांनी हिजाबच्या समर्थनार्थ केलेल्या सर्व 8 याचिका न्यायालयाने फेटाळल्या होत्या, त्यानंतर याचिकाकर्त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.