भव्य दिव्य अशा सोहळ्यात काल (28 मे) संसदेच्या (Parliament Building) नवीन इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. उद्घाटनासोबतच संसद भवनाच्या नवीन इमारतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नवीन संसद भवनात सर्वच गोष्टींबाबत बरीच चर्चा सुरू आहे. त्यापैकी एक नवीन इमारतीच्या भिंतीवर तयार केलेले भित्तीचित्र सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.
[read_also content=”आता देवी सप्तशृंगी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यावर विचार सुरू, सर्वानुमते निर्णय घेण्याची विश्वस्त मंडळाची सूचना https://www.navarashtra.com/india/temple-comity-thinking-about-implementing-dress-code-in-devi-saptshringi-temple-nrps-405962.html”]
उद्घाटनासोबतच संसद भवनाच्या नवीन इमारतीची जोरदार चर्चा सुरू आहे. नवीन संसद भवनात सर्वच गोष्टींबाबत बरीच चर्चा आहे. त्यातील एक नवीन इमारतीच्या भिंतीवर तयार केलेले भीत्तीचित्र आहे. रविवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या या भीत्तीचित्रावर कोरण्यात आली आहे. आरएसएसच्या सांस्कृतिक दृष्टीच्या आधारे ते तयार करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. त्यामध्ये बनवलेल्या भित्तिचित्रात जुन्या भारतातील विविध राज्ये आणि शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय उत्तरपथाचाही उल्लेख आहे, जो प्राचीन काळी कॉरिडॉर होता. हा कॉरिडॉर बल्ख बुखारापर्यंत जात असे, म्हणजेच इराणला स्पर्श करत असे. सिंध, खैबर पख्तुनख्वा इत्यादी या उत्तरपथाच्या कक्षेत येतात. त्यात सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या तक्षशिलाचाही उल्लेख आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही याबाबत ट्विटरवर लिहिले आहे. ते म्हणाले की, अखंड भारत आता स्पष्ट झाला आहे.
भाजपच्या कर्नाटक युनिटने नवीन संसद भवनात बनवलेल्या कलाकृतीचे छायाचित्र शेअर केले आहे. यात प्राचीन भारत, चाणक्य, सरदार वल्लभभाई पटेल, भीमराव आंबेडकर आणि भारताची सांस्कृतिक विविधता दर्शविली आहे. कर्नाटक भाजपने हे ट्विट करून लिहिले की, हे आमच्या महान सभ्यतेचे प्रतीक आहे. त्याचवेळी मुंबई ईशान्येचे लोकसभेचे खासदार मनोज कोटक यांनी नवीन संसद भवनात अखंड भारत असल्याचे लिहिले आहे. त्यातून आपला पराक्रमी भारत दिसून येतो. मोठ्या संख्येने ट्विटर वापरकर्त्यांनी नवीन संसद भवनात अखंड भारताच्या व्हिजनचे स्वागत केले आहे.