भारतीय सैन्यासाठी बनवलेल्या मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्र (MRSAM) ची आज ओडिशा येथील बालासोर एकात्मिक चाचणी श्रेणीतून यशस्वी चाचणी करण्यात आली. क्षेपणास्त्राने काही मिनिटांतच पूर्ण अचूकतेनं लक्ष्य पुर्ण केलं.
हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) इस्रायलच्या IAI कंपनीच्या सहकार्याने बनवले आहे. भारताला इस्रायलकडूम मिळालेलं बराक क्षेपणास्त्रही MRSAM आहे. सरफेस टू एअर मिसाइल (SAM) आर्मी वेपन सिस्टीममध्ये कमांड पोस्ट, मल्टी-फंक्शन रडार, मोबाईल लाँचर सिस्टीम असते. हे इस्रायलच्या बराक-८ या धोकादायक क्षेपणास्त्रावर आधारित आहे.
MRSAM (मध्यम रेंज सरफेस टू एअर मिसाइल) चे वजन सुमारे २७५ किलो आहे. लांबी ४.५ मीटर आणि व्यास ०.४५ मीटर आहे. या क्षेपणास्त्रावर ६० किलोचे वॉरहेड म्हणजेच शस्त्र लोड केले जाऊ शकते. हे दोन टप्प्याचे क्षेपणास्त्र आहे, जे प्रक्षेपणानंतर कमी धूर सोडते. एकदा लाँच केल्यावर, MRSAM (मध्यम रेंज सरफेस टू एअर मिसाइल) थेट आकाशात १६ किमी पर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते. तसेच, त्याची श्रेणी अर्धा किलोमीटर ते १०० किलोमीटर आहे. म्हणजेच या रेंजमध्ये येणारे शत्रूचे वाहन, विमान, ड्रोन किंवा क्षेपणास्त्र नष्ट केले जाऊ शकते.
[read_also content=”दारुगोळ्याच्या ढिगाऱ्यावर बंगाल: २४ तासांत ९ जिल्ह्यांतून ३५० हून अधिक बॉम्ब सापडले, बीरभूम हिंसाचारानंतर पोलीस टाकत आहेत छापे https://www.navarashtra.com/india/bengal-on-gunpowder-pile-more-than-350-bombs-were-found-from-9-districts-in-24-hours-police-are-raiding-after-birbhum-violence-260474.html”]
MRSAM (मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल) क्षेपणास्त्रातील नवीन गोष्ट म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर, म्हणजेच शत्रूचं यान जर चकमा देण्यासाठी वापरत असेल तर ते त्याला पाडू शकेल. त्याचा वेग ६८० मीटर प्रति सेकंद म्हणजेच २४४८ किलोमीटर प्रति तास आहे. त्याचा वेगही त्याला अत्यंत घातक बनवतो. भारताने इस्रायलकडून MRSAM क्षेपणास्त्रांच्या पाच रेजिमेंट खरेदी करण्याबाबत बोलणं झालेलं आहे. यात ४० लाँचर्स आणि २०० क्षेपणास्त्रे असतील. या डीलची किंमत सुमारे १७ हजार कोटी रुपये आहे. या क्षेपणास्त्रांच्या तैनातीमुळे भारताला हवाई संरक्षण ढाल बनण्यास मदत होईल. ते २०२३ पर्यंत तैनात केले जातील अशी अपेक्षा आहे.
[read_also content=”अमरावतीत ट्रक व तवेराचा भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/truck-and-tavera-accident-in-amravati-four-people-died-nrps-260426.html”]