भारतीय रिझर्व बॅंकेने आता 2000 रुपयांच्या नोटा छापण्याचे बंद केले आहे. यामध्ये रिझर्व बॅंकेने सर्व बॅंकांना आवाहन करीत आता ग्राहकांना 2000 रुपयांच्या नोटा न देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना 2000 रुपये बदलून मिळू शकतात. त्यामुळे नागरिकांकडे पुरेसा वेळ आहे. रिझर्व बॅंकेने आवाहन करीत नागरिकांनी 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून घ्याव्यात, असे आवाहन केले आहे. मात्र या निर्णयानंतर सर्वत्र संभ्रमःचे वातावरण तयार झाले आहे. २०००ची नोट छपाई बंद करण्याचा निर्णय म्हणजे नोटबंदी नाही असे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. (RBI withdraw Rs 2000 note)
‘ही नोटबंदी नाही’
देशात 2 हजाराच्या नोटा गेल्या तीन वर्षांमध्ये निवडणुकीच्या वेळीत जास्त बाजारात आलेल्या बघायला मिळाल्या आहेत. ऐरव्ही या नोटा जास्त दिसत नव्हत्या. दरम्यान, बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी प्रतिक्रिया देताना हा नोटबंदीचा प्रकार नाही, असं स्पष्ट केलं आहे. याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार हे रिझर्व्ह बँकेच्या अख्यारीत असतात, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
2 हजाराच्या नोटा जमा करताना बँकेत गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण जेव्हा 500 आणि 1000 च्या नोटा बंद झालेल्या तेव्हा बँकेत चांगलीच गर्दी उसळली होती. पण यावेळी ही गर्दी तितकी मोठी नसेल. कारण 2 हजाराच्या नोटा बाजारात फार कमी दिसत आहेत. कुणी या नोटांचा साठा करुन ठेवला असेल तर त्यांना या नोटा आता पुन्हा बँकेत भरावा लागतील हे मात्र नक्की आहे.






