शौकीन चोर घोड्यावर स्वार होऊन चोरी करायला आले, पण असं काही झालं की… सरपटत पळावं लागलं…!

दोन चोरट्यांनी घोड्यावर स्वार होऊन मंदिरातून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र याची माहिती स्थानिकांना होताच एकच गोंधळ उडाला. चोरांना चोरी न करताच तिथून आल्या पावली परतावं लागलं.

    आतापर्यंत चोरीच्या (stealing) अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील पण चोरांची अशी अनोखी शैली तुम्ही पाहिली नसेल. कानपूरमध्ये दोन चोरटे चोरी करण्यासाठी चक्क घोड्यावर स्वार होऊन आले. मात्र या चोरांचा चोरीचा प्लॅन फसला. मात्र या दरम्यान असं काही घडलं की त्यांना आल्या पावली पळून जावं लागलं. या घटनेची संपुर्ण शहरात एकच चर्चा सुरू आहे. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

    नेमकं काय घडलं

    कानपूरच्या बरा भागातील श्री राधा कृष्ण मंदिरातील घोड्यावर चोरांची ही घटना घडली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच एक दानपेटी ठेवली आहे. 20 डिसेंबरच्या रात्री घोड्यावर स्वार झालेले चोरटे येथे आले. हे  दोन चोरटे घोड्यावर स्वार होऊन आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. एक घोड्यावर बसून होता तर दुसरा खाली उतरून दानपेटी फोडू लागला. ठोठावल्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे दोन तरुण जागे झाले आणि त्यांनी मंदिराच्या दिशेने निघाले.

    तरुण येत असल्याचा आवाज ऐकून चोरटे सावध झाले. पटकन खाली उतरलेला चोर तिथून पळून गेला, मग दोघेही घोड्यावरून पळून गेले. ही संपूर्ण घटना मंदिराजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. लोक म्हणत आहेत की आजचे चोर देखील खूप प्रयोगशील झाले आहेत. त्यांची चोरी करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी ते गुपचूप घरात घुसायचे आणि सर्व सामान घेऊन गायब व्हायचे. कधी छतावरून आत शिरायचे तर कधी बाईक किंवा कारने पोचायचे पण इथे ते मंदिरात चोरी करायला घोड्यावर येतात.