RSSबंदीच्या मागणीनंतर धमक्या, शिवीगाळ करणारे कॉल्स...; प्रियांक खर्गेंचा पुन्हा पलटवार
Priyank Kharge on RSS: कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शासकीय व मान्यताप्राप्त शाळांमधील तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पण ही मागणी केल्यापासून त्यांना सातत्याने धमकीचे कॉल येऊ लागल्याचा दावा प्रियांक खर्गे यांनी केला आहे. यामुळे देशात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
AF-PAK Tension: ‘झोपला होतात का?’ पाकिस्तान चेकाळले; तालिबानच्या हल्ल्यात 58 सैनिकांचा मृत्यू, मु
प्रियांक खर्गे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. “गेल्या दोन दिवसांपासून माझा फोन वाजत आहे. सरकारी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक संस्थांमध्ये आरएसएसच्या कार्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे आणि ते थांबवण्याचे धाडस केल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला धमक्यांचे, घाबरवण्याचे आणि घाणेरड्या प्रकारे शिवीगाळ केली जात आहे. पण मला त्रास होत नाही किंवा आश्चर्यही वाटत नाही.”
जर आरएसएसने महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सोडले नाही, तर ते मला तरी का सोडतील. पण जर आरएसएस ला वाटत असेल की त्यांच्या धमक्या आणि वैयक्तिक टिका करून ते मला शांत करतील तर ते चुकीचे आहे. हे तर आता सुरू झाले आहे. बुद्ध, बसवण्णा आणि बाबासाहेबांच्या तत्त्वांवर आधारित समाज निर्माण करण्याची आणि समता, तर्क आणि करुणेवर आधारित समाज निर्माण करण्याची आणि या देशाला सर्वात धोकादायक विषाणूपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे.” असंही प्रियांक खर्गे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कर्नाटकचे मंत्री खर्गे यांनी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आरएसएसच्या कारवायांवर बंदी घालण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली, मी कधीही संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली नाही. सरकारी महाविद्यालये, शाळा, विद्यापीठे आणि क्रीडांगणे याठिकाणी होणाऱ्या आरएसएसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आरएसएस सरकारी महाविद्यालये, शाळा, विद्यापीठे आणि क्रीडांगणे कशासाठी वापरत आहेत? ते लहान मुलांच्या मनात विष भरत आहेत. ते त्यांना धर्माचे शिक्षण देत आहेत,” असा आरोपही प्रियांक खर्गेंनी यावेळी केला.
Oppo Find X8 Pro Price Dropped: Oppo Find X9 लाँच होण्यापूर्वीच स्वस्त झाला जुना स्मार्टफोन
ते पुढे म्हणाले, ” मी काय प्रार्थना करावी, मी काय खावे आणि मी काय घालावे. हे माझे पालक मला शिकवतील. ते शाळेतही शिकवले जाईल. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी ते शिक्षण घेण्यासाठी मुले शाळां-महाविद्यालयांमध्ये येत असतात. पण भाजप नेत्यांची मुले आरएसएस शाखांमध्ये का जात नाहीत किंवा गोरक्षक आणि धर्माचे रक्षक का बनत नाहीत, असा प्रश्नही प्रियांक खर्गेंनी उपस्थित केला. तसेच, जेव्हा आपण राज्यात सत्तेत असतो तेव्हा सरकारी मालमत्तेचा वापर जातीय द्वेषाची बीजे पेरण्यासाठी केला जाणार नाही.” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आरएसएस कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक निदर्शनांच्या मुद्द्यावर म्हणाले की संघटनेला फक्त खाजगी जागांमध्ये काम करण्याची परवानगी दिली पाहिजे. ते म्हणाले, “त्यांना ते त्यांच्या घरात, भाड्याने घेतलेल्या हॉटेलमध्ये किंवा त्यांना पाहिजे तिथे करू द्या, परंतु जातीयवादाची बीजे पेरण्याचे आणि लोकांना धमकावण्याचे हे सार्वजनिक प्रदर्शन योग्य नाही. ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की ते भारतीय संविधानाच्या, देशाच्या कायद्यांच्या वर आहेत. मला माफ करा, ते तसे नाहीत.”
आरएसएस कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक निदर्शनांबाबत बोलताना प्रियांक खर्गे म्हणाले की, संघटनेला फक्त खाजगी ठिकाणी कार्यक्रम करण्याची परवानगी दिली पाहिजे. त्या म्हणाल्या, “त्यांना त्यांच्या घरात, भाड्याने घेतलेल्या हॉटेलमध्ये किंवा त्यांना योग्य वाटेल तिथे कार्यक्रम घेऊ द्या. परंतु जातीयतेची बीजे पेरणारे आणि लोकांना धमकावणारे असे सार्वजनिक प्रदर्शन योग्य नाही. ते स्वतःला भारतीय संविधान आणि देशाच्या कायद्यापेक्षा मोठे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते तसे नाहीत, याची खंत आहे.”