सुरत नाही तर 'या' स्थानकावरुन सुटणार रेल्वे गाड्या, कामांमुळे ३० सप्टेंबरपर्यंत बदल
सुरत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म चारवरील ट्रॅफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाने 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. या कामामुळे, सुरत रेल्वे स्थानकावरून सुरू होणार्या आणि समाप्त येणार्या भुसावळ विभागातील सहा रेल्वे गाड्या सुरत स्थानकाऐवजी उधना स्थानकावरून सुटणार व थांबणार आहे. सुरतऐवजी उधना स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांपैकी 1907 सुरत भुसावळ पॅसेंजर (8 ते 30 सप्टेंबर) उधना येथून सायंकाळी 5.24 वाजता सुटेल.
सुरत स्थानकाऐवजी उधना स्थानकापासून सुटणार्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 19007 सुरत-भुसावळ पॅसेंजर 8 ते 30 सप्टेबरपर्यंत उधना स्थानकावरून सायंकाळी 5.24 वाजता सुटेल तर गाडी क्रमांक 19005 सुरत-भुसावळ एक्स्प्रेस ही 8 ते 30 सप्टेंबरपर्यंत उधना स्थानकावरून रात्री 11.30 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 09065 सुरत-छपरा विशेष गाडी 9 ते 30 सप्टेंबरपर्यंत उधना स्थानकावररून सकाळी 8.35 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 19045 सुरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस 8 ते 30 सप्टेंबरपर्यंत उधना स्थानकावरून सकाळी 10.20 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 22947 सुरत-भागलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस 10 ते 29 सप्टेबरपर्यंत उधना स्थानक येथून सकाळी 10. 20 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 20925 सुरत-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाडी 9 ते 29 सप्टेंबरपर्यंत उधना स्थानकावरून दुपारी 12.30 वाजता सुटेल.
भुसावळ-सुरत एक्स्प्रेस (19006) 8 ते 30 सप्टेंबर, भुसावळ-सुरत एक्स्प्रेस (19006), अमरावती-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस 9 ते 30 सप्टेंबरपर्यत, छपरा-सुरत (09066) स्पेशल गाडी 11 ते 25 सप्टेंबरपर्यत, छपरा-सुरत ताप्ती गंगा (19046) एक्स्प्रेस 8 ते 29 सप्टेंबरपर्यत, भागलपूर-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस (22948) ही गाडी 9 ते 30 सप्टेबरपर्यंत उधना येथे शार्ट टर्मिनेट करण्यात येईल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.