‘वर्ल्ड कप’मध्ये भारताचा झालेला पराभव जिव्हारी; नैराश्येतून दोघांनी संपविले जीवन

'वर्ल्ड कप 2023' (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र, विश्वचषक गमावल्यामुळे काही लोकांना इतका धक्का बसला की, देशातील दोन जणांनी आपले आयुष्य संपवले आहे.

    नवी दिल्ली : ‘वर्ल्ड कप 2023’ (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र, विश्वचषक गमावल्यामुळे काही लोकांना इतका धक्का बसला की, देशातील दोन जणांनी आपले आयुष्य संपवले आहे.

    राहुल लोहार (23) नावाच्या तरुणाने रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. बांकुरा येथील बेलियाटोर पोलिस स्टेशन हद्दीतील सिनेमा हॉलजवळ त्याने आपल्या आयुष्याचा अखेर केला. राहुल हा परिसरातील एका कपड्याच्या दुकानात काम करायचा. भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी त्याने रविवारी सुट्टी घेतली होती, असे राहुलचे नातेवाईक उत्तम सूर यांनी सांगितले.

    ओडिशाच्या जाजपूरमधूनदेखील दुसरी धक्कादायक घटना समोर आली. देव रंजन दास नावाच्या 23 वर्षीय व्यक्तीला टीम इंडियाची हार पचवणे कठीण झाले होते. त्याने रविवारी रात्री सामना संपल्यानंतर लगेचच बिंझारपूर भागात गळफास घेतला. स्वतःच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. देव रंजन दास हा भावनिक विकार ग्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, असे दासच्या एका नातेवाईकाने सांगितले.