We have come together to save the country
नवी दिल्ली : इंडिया आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. माझ्यासमोर कोणतीही स्वप्न नाहीत. जनता ठरवेल ते आम्ही करणार आहोत. कधीतरी चेहरा ठरवावा लागेल, कोणीतरी निमंत्रक, समन्वयक ठरवावा लागेल. आजच्या बैठकीत आम्ही समन्वयक ठरवणार, असे शिवसेना उद्धव ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे समन्वयक होणार का? पाहा काय म्हणाले…#UddhavThackeray #INDIAlliance @ShivSenaUBT_ @OfficeofUT #INDIAMeeting pic.twitter.com/KxbeBgNG0V
— BBC News Marathi (@bbcnewsmarathi) December 19, 2023
देवेंद्र फडणवीसांना टोमणा
उद्धव ठाकरे यांनी नाक पुसताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोमणा मारला. मी कोणाची स्टाईल मारत नाही. सर्दी झाली आहे, उगीच हुडी, गॉगल घालून फिरत नाही, असे ठाकरे म्हणाले. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.