नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड आणि माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांची गेल्या महिन्यात काही मारेकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात असतानाच प्रयागराजमध्ये हत्या केली. आता पोलीस अतिकच्या इतर साथीदार आणि त्याच्या पत्नीच्या मागावर आहेत. त्यानुसार, पोलिसांनी तिघांविरोधात लुकआऊट नोटीस (Lookout Notice) जारी केली आहे.
उमेश पाल खून प्रकरणाला (Umesh Pal Murder Case) जवळपास तीन महिने उलटले आहेत तरीही उत्तर प्रदेश एसटीएफला शाइस्ता परवीन, गुड्डू मुस्लिम आणि माफिया अतिक अहमदची पत्नी साबीर यांची कोणतीही माहिती नाही. हे तिघेही परदेशात पळून जातील, अशी भीती लक्षात घेता त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. हे तिघेही परदेशात पळून जाण्याची भीती एसटीएफला आहे. या तिघांच्या शोधासाठी सातत्याने छापे टाकले जात आहेत. मात्र, अद्याप ते पकडले गेलेले नाहीत. इतकेच नाहीतर उत्तर प्रदेश पोलिसांनी शाइस्ता परवीनवर यापूर्वीच 50 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
लुकआऊट नोटीस एका वर्षासाठी…
प्रयागराज पोलिसांनी आपला अहवाल राज्य सरकारला पाठवला होता. यानंतर तिघांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. ही नोटीस एका वर्षासाठी लागू असेल. तीन आरोपींपैकी कोणीही देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तपास यंत्रणा प्रयागराज पोलिसांना कळवतील, असेही यामध्ये म्हटलं जात आहे.