नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. (Rainy session in sansad) पण सभागृहात लोकप्रतिनिधी (MP) जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी आपआपसात वाद, गोंधळ आदीमुळं कामकाज तहकूब (house adjournment) करावे लागत आहे. कालच काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी (congress Adhirranjan choudhari) यांनी राष्ट्रपतींबाबत (President) आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्यावरुन काल दोन्ही सभागृहात गदारोळ, गोंधळ त्यामुळं कामकाज तहकूब करावे लागले होते. तसेच सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रपत्नी या कॉमेंटवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया (Sonia Gandhi) गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यामुळे सभागृहात गोंधळ झाला. याचाच प्रत्यय पुन्हा सभागृहात आज दिसला.
[read_also content=”होऊ दे खर्च! मोदी सरकारने मागील पाच वर्षात जाहिरातीवर उधळले तब्बल तीन हजार कोटी https://www.navarashtra.com/india/modi-government-last-five-years-for-advertising-three-thousand-crore-rupess-anurag-thakur-information-309397.html”]
दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन (Rainy session in sansad) १८ जुलैपासून सुरू झाले आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि अग्निपथच्या मुद्द्यावर विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवला. तसेच विरोधकांनी महागाईवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी उत्तरे देणं टाळलं. त्यामुळं विरोधक आक्रमक झाल्याने आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ, गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे आधी लोकसभाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिवेशन स्थगित केले. मात्र सभागृह सुरु झाल्यानंतर सुद्धा विरोधक व सत्ताधारी यांच्यात गोंधळ झाल्याने, सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले असल्याची माहिती लोकसभाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आली. (Upper house, lower house adjournment till Monday)