भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार (फोटो- istockphoto)
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी अनेक बाबींवर पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि दोन्ही देशांमधील व्यापार वाढवण्याबाबत चर्चा झाली. दरम्यान अमेरिका दौऱ्यानंतर आता भारताची ताकद अजून वाढणार आहे. भारताची हवाई दलाची ताकद वाढणार आहे. कारण भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात F-35 लढाऊ विमान दाखल होणार आहे.
अमेरिका भारताला F-35 लढाऊ विमान देणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल घोषणा केली आहे. F-35 लढाऊ विमान हे जमीन, पानी आणि आकाश या तीनही ठिकाणी लढण्यास सक्षम आहे. हे लढाऊ विमान भारताकडे आल्यास भारतासाठी ते गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. तसेच या निर्णयामुळे चीन आणि पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.
F-35 लढाऊ विमान हे अमेरिका, नाटो आणि अन्य सहकरी देशांसाठी महत्वाचे ठरले आहे. F-35 लढाऊ विमान आता भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणार आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील करारामुळे चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढली आहे. दरम्यान हे लढाऊ विमान किती ताकदवान आहे ते जाणून घेऊयात.
अमेरिकेचे F-35 लाइटनिंग II लढाऊ विमान हे त्याच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. यामुळे ते जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान म्हणून ओळखले जाते. या विमानाचे निर्माण लॉकहिड मार्टिनने केले आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी असलेले हे पाचव्या पिढीतील फायटर जेट आहे. कोणत्याही शत्रू राष्ट्राचे रडार या विमानाला पकडू शकत नाही. यामुळे हे विमान शत्रू राष्ट्राच्या सुरक्षित भागात देखील घुसू शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ कृतीने भारतीयांचे हृदयच जिंकले
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री जगभर प्रसिद्ध आहे. त्यांच्या गहिऱ्या स्नेहबंधाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला, जेव्हा मोदी यांनी व्हाइट हाऊसला भेट दिली. या भेटीदरम्यान, ट्रम्प यांनी जे केले ते पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींसाठी असे काही केले, ज्यामुळे त्यांची नम्रता आणि आदरभावनेचा प्रत्यय आला. बैठकीदरम्यान, मोदी जेव्हा स्वाक्षरीसाठी खुर्चीकडे जाऊ लागले, तेव्हा ट्रम्प यांनी स्वतः पुढे येऊन त्यांची खुर्ची ओढली आणि मोदींसाठी जागा तयार केली. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांनी कौतुकाने पाहिले. राष्ट्राध्यक्षपद हे जगातील सर्वात शक्तिशाली पद मानले जाते, परंतु ट्रम्प यांनी मोदींसाठी दाखवलेला हा सन्मान भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण ठरला. स्वाक्षरीच्या वेळीही ट्रम्प मोदींच्या मागे उभे राहून त्यांचा सन्मान करत होते.