उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि समीकरण; काय आहे NDA आणि INDIA आघाडीचे नंबर गेम?
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील महायुतीने उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार पदासाठी काही नावे जाहीर केली आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत देशात राजकीय वर्तुळातही मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एनडीएने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या उमेदवारासाठी त्यांच्या पक्षाकडून पाठिंबा मागितला. पण त्याचवेळी इंडिया ब्लॉक आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत रणनीती बैठक घेणार आहे. दरम्यान, निवडणूक समीकरणे आणि संख्याबळामुळे ही निवडणूक आणखी मनोरंजक बनली आहे.
उपराष्ट्रपतीपदाची निवड सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा वेगळी असते. उपराष्ट्रपतीची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्वाद्वारे एकल हस्तांतरणीय मत प्रणालीने केली जाते. विजयी घोषित होण्यासाठी उमेदवाराला कोटा ओलांडावा लागतो, जो एकूण वैध मतांची संख्या दोनने भागून आणि एक जोडून काढला जातो. पहिल्या मतमोजणीत जर उमेदवार कोटा गाठू शकला नाही, तर सर्वात कमी पहिल्या पसंतीची मते असलेला उमेदवार निवडणुकीतून वगळला जातो. त्यानंतर त्याच्या मतपत्रिका दुसऱ्या पसंतीनुसार पुन्हा वितरित केल्या जातात. ही प्रक्रिया उमेदवाराला बहुमत मिळेपर्यंत सुरू राहते.
Delhi: DPS द्वारकासह 3 शाळेत बॉम्बने उडविण्याची धमकी, रिकामे करण्यात आले कॅम्पस
निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण ७८२ खासदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्यापैकी ५४२ लोकसभेचे आणि २४० राज्यसभेचे आहेत. निवडणुकीत बहुमतासाठी ३९२ खासदारांची आवश्यकता असते. तसेच, सरकारला ४२७ खासदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. यात २९३ लोकसभा आणि १३४ राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय, विरोधकांना ३५५ खासदारांचा पाठिंबा आहे, ज्यामध्ये २४९ लोकसभा आणि १०६ राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे. यापैकी १३३ खासदारांचा पाठिंबा अजूनही अनिर्णीत मानला जात आहे, जो या निवडणुकीच्या निर्णयात निर्णायक ठरू शकतो.
त्यामुळे एनडीएकडून ही १३३ मते त्यांच्या बाजूने मिळविण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीतही या संख्याबळावर चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते त्यांच्या उमेदवाराला बळकटी देण्यासाठी आणि सरकारच्या नंबर गेमला आव्हान देण्यासाठी नवी रणनीती आखू शकतात. दुसरीकडे, सरकार त्यांच्या मित्रपक्षांच्या मदतीने विरोधी पक्षांचे प्रयत्न कमकुवत करण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यासाठी सुरूवातीलाच राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षांशी चर्चा करत विरोधी पक्षांचा पाठिंबा मागितला आहे, कारण या अनिर्णीत मतांमध्ये अनेक प्रादेशिक पक्षांचा प्रभाव असू शकतो.
लोकसभा (५४२ खासदार)
सरकारसोबत असलेले: २९३
विरोधी पक्षांचे: २४९
राज्यसभा (२४० खासदार)
सरकारसोबत असलेले: १३४
विरोधी पक्षांचे: १०६
सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम
या समीकरणाच्या माध्यमातून, भाजपच्या उमेदवारला बहुमतापेक्षा जास्त म्हणजे ४२७ खासदारांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे, विरोधी इंडिया आघाडीला ३५५ खासदारांचा पाठिंबा आहे. पण या निवडणुकीत विरोधक एकजूट राहणार की काही खासदार क्रॉस व्होटिंग करून सरकारच्य उमेदवाराला पाठिंबा देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या, भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल आणि त्यांचे मजबूत नेते सीपी राधाकृष्णन यांना एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यासोबतच, राधाकृष्णन यांच्या माध्यमातून भाजपने दक्षिण भारतातील राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप तेथील स्थानिक पक्षांशी युती करून दक्षिणेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे, पण या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.