दिल्लीच्या शाळेत बॉम्बने उडविण्याची धमकी (फोटो सौजन्य - ANI)
आज सकाळी दिल्लीच्या द्वारका परिसरात सुरक्षा दहशतीचे वातावरण होते. दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) द्वारका, सेक्टर ४ मधील मॉडर्न कॉन्व्हेंट स्कूल आणि श्री राम वर्ल्ड स्कूल यांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले. दिल्ली अग्निशमन दलाला सकाळी ७:३४ वाजता याची माहिती मिळाली, त्यानंतर तातडीने कारवाई सुरू करण्यात आली. पोलीस याचा पुढील तपास करत असल्याचे ANI ने दिलेल्या वृत्तानुसार समोर आले आहे
तिन्ही शाळा रिकामी करण्यात आल्या
घटनेनंतर तिन्ही शाळा रिकामी करण्यात आल्या. मुलांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. डीपीएस द्वारका यांनी तातडीने पालकांना नोटीस बजावली आणि अपरिहार्य परिस्थितीमुळे आज शाळा बंद राहणार असल्याचे कळवले. स्कूल बस आणि खाजगी व्हॅनने येणाऱ्या मुलांना तात्काळ घरी पाठवण्यात येत आहे.
डीपीएस स्कूलने पालकांना त्यांच्या मुलांना शाळेच्या गेटवरून किंवा बस स्टॉपवरून घेण्यास सांगितले आहे. शाळेने असेही सांगितले की आज होणाऱ्या सर्व चाचण्या, उपक्रम आणि कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील.
राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने तपास केला
पोलिसांनी सांगितले की, वेगवेगळ्या ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती. शाळेत आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. बॉम्ब निकामी पथके घटनास्थळी आहेत आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील उपलब्ध आहेत. पोलीस घटनेचा तपास करत आहेत आणि धमकीचे ईमेल कुठून आले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्थानिक लोक आणि पालकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. एका पालकाने सांगितले की, सकाळी लवकर अशा बातम्या ऐकल्यानंतर मी घाबरलो. मुले शाळेत जात होती, पण आता आम्हाला त्यांना परत घेऊन जावे लागले.
शाळा प्रशासन आणि पोलिसांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही धोका पत्करला जात नाही. दिल्लीत यापूर्वीही शाळांना अशा धमक्या अनेक वेळा मिळाल्या आहेत, त्यापैकी बहुतेक अफवा असल्याचे निष्पन्न झाले. तरीही, यावेळी प्रशासन खूप सावधगिरी बाळगत आहे. नक्की ही धमकी कोणी दिली याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही.
ANI ने दिली माहिती
#WATCH | Delhi Public School (DPS) Dwarka received a bomb threat call today. Authorities have evacuated the school premises as a precautionary measure. Police and bomb disposal squads have been called to the spot for search.
(Outside visuals from the school) pic.twitter.com/cm7r2aLGeb
— ANI (@ANI) August 18, 2025
कोण आहेत सीपी राधाकृष्णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?