झारखंडमध्ये पुन्हा एकदा दोन गटांमध्ये हिंसाचार, एसआयसह दोन जण जखमी

झारखंडमध्ये पुन्हा एकदा दोन गटांमध्ये (Violence in Jharkhand) हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यादरम्यान दोन पोलिस जखमी झाल्याचेही वृत्त आहे. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील ही घटना या चकमकीदरम्यान विटा आणि दगडफेक करण्यात आली.

    नवी दिल्ली : झारखंडमध्ये पुन्हा एकदा दोन गटांमध्ये (Violence in Jharkhand) हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यादरम्यान दोन पोलिस जखमी झाल्याचेही वृत्त आहे. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील ही घटना या चकमकीदरम्यान विटा आणि दगडफेक करण्यात आली. यात एका एसआयसह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले.

    याबाबत एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, टाऊन पोलिस स्टेशन हद्दीतील पाथरा चौकात मूर्ती विसर्जन मिरवणुकीत हाणामारी झाली. हे प्रकरण जमिनीच्या तुकड्यावरून झालेल्या वादाशी संबंधित आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचताच एका समाजातील दोन गटांनी विटा, दगडफेक सुरू केली. यावेळी पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले.

    एसपी नथू सिंग मीना यांनी सांगितले की, दोन्ही गटांनी पोलिसांवर हल्ला केला आणि पोलिसांच्या वाहनांचेही नुकसान केले. टाऊन पोलिस स्टेशनचे प्रभारी मधुसूदन मोडक यांना किरकोळ दुखापत झाली, तर उपनिरीक्षक उमेश मोदी यांच्या डोक्याला दुखापत झाली.

    या घटनेनंतर एसआयला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन गावांतील रहिवाशांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे मीना यांनी सांगितले.