मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कल्याण-डोंबिवलीत उद्या शाळा-कॉलेजेस बंद! (Photo Credit- AI)
⛈️🚨भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. 🏫 या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना… — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 5, 2026
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना उद्या, सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनदेखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात देखील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली, बदलापूरमध्ये देखील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांनी निर्गमित केलेल्या उपरोक्त आदेशाच्या अनुषंगाने तसेच आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिकायांच्या निर्देशानुसार, उद्या सोमवार, दिनांक 06 जुलै 2026 रोजी अतिवृष्टी विचारात घेऊन विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. सदर आदेशाची सर्व संबंधित शाळांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षकांना याबाबतची माहिती त्वरित कळविण्यात यावी असा आदेश पालिकेकडून जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि लहान मुलांचे हाल होऊ नयेत, यासाठी रायगड आणि पालघर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत सोमवारी शाळा-कॉलेजेसना सुटी दिली आहे. कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.






