फोटो - सोशल मीडिया
उत्तर प्रदेश : भारतीय रेल्वे सेवेमध्ये सर्वांत जास्त चर्चा वंदे भारत रेल्वेगाडीची रंगली आहे. नवीन युगातील आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेली वंदे भारत अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. सुविद्य सेवा आणि स्टाईलिश लूक यामुळे वंदे भारत प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र आता वंदे भारत बंद पडल्याची घटना घडली आहे. यामुळे आता चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्लीहून बनारसला चाललेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे इंजिन अचानक बंद पडले. त्यासाठी मालगाडीच्या इंजिनने वंदे भारतला धक्का द्यावा लागला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली ते बनारस वंदे भारत एक्सप्रेस धावत होती. मात्र इटावामधील भरथना रेलवे स्टेशनवर एक्सप्रेस गाडी अचानक थांबली. इंजिनामध्ये तांत्रिक बिघाज झाल्यामुळे वंदे भारत तिथे थांबवण्यात आली. यामुळे रेल्वेच्या नियोजनामध्ये देखील बदल झाला. ट्रेन जागेवर थांबल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. परंतु त्यांना ट्रेनमधील बिघाड दूर करता आला नाही. यावेळी वंदे भारत ट्रेनमध्ये 750 प्रवाशी होते. तसेच राजकीय नेतेही होते.
वंदे भारत एक्सप्रेस अचानक थांबल्यामुळे काही प्रवाशांनी गोंधळ सुरु केला. तसेच बदली रेल्वेबाबत विचारणा करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वंदे भारतमधील प्रवासी रेल्वे प्रशासनाने शताब्दी एक्सप्रेस आणि अयोध्या जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस थांबवून प्रवाशांना त्या गाड्यांमध्ये बसवण्यात आले. यामुळे प्रवाशांची काही काळ गैरसोय झाली.
3 घंटे बाद भारतीय रेलवे का पुराना इंजन आया और खराब हुई अत्याधुनिक वंदेभारत ट्रेन को खींचकर ले गया। वन्देभारत के कुछ यात्री अन्य ट्रेनों से भेजे गए। वन्देभारत में खराबी के चलते AC भी नहीं चल पाया। इससे हजारों यात्री परेशान हुए।#Etawah #TRAIN https://t.co/0cSd9fFuCe pic.twitter.com/HNmZ12zLFW
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) September 9, 2024
तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वंदे भारत खूप वेळ भरथना रेलवे स्टेशनवर थांबून राहिली होती. अखेर तीन तासांनंतर गाडीला नेण्यासाठी मालगाडीचे इंजिन बोलवण्यात आले. त्यानंतर ती गाडी नेण्यात आली. सोशल मीडियावर वंदे भारतला मालगाडीचे इंजिन नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी जुनं ते सोनं आणि नव्याचं नऊ दिवस, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी द्यायला सुरुवात केली आहे.