अहमदाबाद अपघातामध्ये वाचलेले विश्वास कुमार रमेश यांनी आपबीती सांगितली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यामध्ये 265 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विमानामध्ये उड्डाणावेळी 242 लोक होते. यामधील 12 हे क्रू मेंबर्स होते. फ्लाईट AI 171 मध्ये 169 भारतीय तर 53 ब्रिटिश नागरिक प्रवाशांमध्ये असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक प्रवास करत होते. यामध्ये केवळ एक माणूस जिवंत राहिला आहे. त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील दुर्घटना स्थळाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी घटनास्थळी जाऊन भेट देत पाहणी केली आहे. तसेच या घटनेमधील जखमींची देखील भेट घेतली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळाला देखील भेट दिली. विमानतळावरील अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदींनी बैठक घेत या घटनेबाबत चर्चा केली आहे. याचबरोबर अहमदाबाद विमान अपघातामध्ये एकमेव वाचलेल्या विश्वास कुमार रमेश यांच्यासोबत देखील पंतप्रधानांनी संवाद साधला आहे.
Met those injured in the aftermath of the tragic plane crash in Ahmedabad, including the lone survivor and assured them that we are with them and their families in this tough time. The entire nation is praying for their speedy recovery. — Narendra Modi (@narendramodi) June 13, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या अपघातामध्ये वाचलेला विश्वास कुमार रमेश हा एकमेव व्यक्ती ठरला आहे. यामुळे अपघातापूर्वी आणि अपघातापूर्वी घडलेला प्रसंग त्याने सांगितला आहे. त्याने एका वाहिनीला सांगितले की, “विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर पुढच्या 30 सेकंदांमध्येच मोठे आवाज यायला लागले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत विमान कोसळलं. मला शुद्ध आली तेव्हा माझ्या आसपास सगळीकडे लोकांचे मृतदेह होते. मी प्रचंड घाबरलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो. तिकडे सगळीकडे विमानाचे जळते तुकडे पसरलेले होते. कुणीतरी मला पकडले आणि रुग्णवाहिकेत नेलं आणि तिथून रुग्णालयात आणले”, अशी आपबिती विश्वास कुमार रमेश यानी सांगितली आहे.
अहमदाबाद विमान अपघाताच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
एअर इंडियाच्या अपघात झालेल्या AI 171 या विमानामधून विश्वास कुमार रमेश हे देखील प्रवास करत होते. ते विमानातील 11 A या जागेवर बसले होते. ३९ वर्षीय विश्वास रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. ते दीव येथे आपल्या भावासोबत आले होते. त्यांची पत्नी व मुलं लंडनमध्ये राहतात. अहमदाबादहून ते आपल्या भावासोबत परत निघाले होते. मेघानीनगर परिसरात विमान कोसळल्यानंतर त्यांच्यापैकी २४१ प्रवासी आणि विमानातील सर्व क्रू मेंबर्स यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातातून फक्त विश्वास रमेश बचावले.






