विमानात ११A सीटवर बसलेले विश्वास कुमार रमेश हे विमान अपघातात बचावले आहेत (फोटो - सोशल मीडिया)
Vishwas Kumar Ramesh Survived : अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे विमानाचा भीषण अपघात झाला आहे. एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या प्रवाशी विमानाचा हा अपघात मृत्यूचा तांडव ठरला आहे. यामध्ये 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विमानामध्ये उड्डाणावेळी 242 लोक होते. यामधील 12 हे क्रू मेंबर्स होते. फ्लाईट AI 171 मध्ये 169 भारतीय तर 53 ब्रिटिश नागरिक प्रवाशांमध्ये असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक प्रवास करत होते. यामध्ये केवळ एक माणूस जिवंत राहिला आहे.
अहमदाबाद विमानाचा अपघात हा उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये झाला. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये विमान क्रॅश झाल्यानंतर आगीचा मोठा भडका उडालेला आणि धूराचे लोट लांबपर्यंत परसलेले दिसून आले. या विमान अपघातामध्ये सर्व प्रवासी व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये केवळ विश्वास कुमार रमेश यांचा जीव वाचला आहे. विश्वास कुमार रमेश हे असे एकमेव प्रवासी आहेत जे जखमी अवस्थेमध्ये आढळून ते जीवंत सापडले आहेत. कालपासून विश्वास कुमार रमेश हे नाव जोरदार चर्चेत आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी अहमदाबाद विमान अपघातामध्ये जिवंत राहिला आहे. यामुळे सोशल मीडियासह सर्वत्र त्यांच्या नशिबाचे कौतुक होत आहे. विश्वास कुमार रमेश हे फ्लाईट AI 171 मध्ये 11A या सीटवर बसलेले होते. विमानामध्ये सहसा या जागेवर बसण्यासाठी प्रवासी तयार नसतात. 11A या सीटकडे सर्व प्रवासी नाक मुरडतात. मात्र याच जागेवर बसलेल्या विश्वास कुमार रमेश यांचा जीव वाचला आहे.
अहमदाबाद विमान अपघाताच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
फ्लाईट अटेन्डेंट्सने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशी 11A आणि 11F हे आसन घेण्यास नकार देत असतात. प्रवाशांना हे आसन नको असते. कारण ही जागा विमानाच्या अगदी मध्यभागी आहे. यामुळे प्रवाशांना हे सीट मिळाल्यावर उतरताना त्यांचा नंबर अगदी शेवटी येतो. त्यामुळे अनेकांना हे सीट नको असते. जर तुम्हाला घाई असेल, गडबड असेल, अथवा विमानातून उतरल्यावर दुसरे विमान पकडायचे असेल तर 11A हे सीट तुम्हाला उशीर करू शकते, त्यामुळे प्रवाशी ते टाळतात असे अटेन्डेंट्सने सांगितले. तर फ्लाईट रडार 24 नुसार, बोईंगच्या एसी सिस्टिममुळे अनेकदा 11A या सीटवर खिडकी नसते. अथवा असली तरी ती अत्यंत छोटी असते. त्यामुळे तिथून जमिनीवरील दृश्य दिसत नाहीत. यामुळे 11A हे सीट घेण्यास प्रवासी नकार देत असतात. मात्र याच जागेवर बसलेल्या विश्वास कुमार रमेश यांचा जीव वाचला आहे.