भारतीय सैन्य म्हण्टलं की समोर येत ऊन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्या सुरक्षेच्या अहोरात्र झटणारे भारतीय सैनिक. अनेक प्रतिकूल परिस्थितीत त्यांना देशाच्या सिमेचं रक्षण करावं लागतं. या सगळ्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी त्यांच आरोग्यही तस चांगला राहायला हव यासाठी ते काय खात असतील? त्यांचा आहारा कसा असतो. याबदद्ल काही गोष्टी जाणून घ्या.
आपल्या या सैनिकांच आरोग्य चांगल राहाव यासाठी भारत सरकार सकस आहार पुरवते. ज्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक पोषणाचा समावेश असतो. सामान्य भारतीय नागरिकाच्या मनात नेहमीच भारतीय सैनिकांप्रमाणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचे स्वप्न असते. याबद्दल CISF च्या माजी सैनिकाने भारतीय सैनिकांचा आहार असतो हे सांगितलं.
[read_also content=”बाबाजी की जय हो! नागपूर पोलिसांकडून बागेश्वर महाराजांना क्लीन चिट! धीरेंद्र शास्त्रींनी अंधश्रद्धा पसरवल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचा दावा https://www.navarashtra.com/india/clean-chit-to-bageshwar-maharaj-from-nagpur-police-claims-that-no-evidence-has-been-found-that-dhirendra-shastri-spread-superstitions-nrps-364437.html”]
सीआयएसएफचे माजी हेड कॉन्स्टेबल निशांत कुमार यांनी सांगितले की, भारतीय जवानांच्या आहारात कोणताही पदार्थ खूप विचारपूर्वक समाविष्ट केला जातो. ज्यासाठी उच्च अधिकार्यांची बैठक होते आणि संपूर्ण भारतभर सगळ्यांसाठी एकच आहार निश्चित करण्यत येतो. ज्यामध्ये अधिकाऱ्यांच्या गंभीर बैठकीनंतरच कोणताही बदल करता येतो.
भारत सरकारकडून आपल्या सैनिकांच्या आहाराच्या विविधतेचीही पुरेपूर काळजी घेतो, जेणेकरुन कोणतेही आवश्यक पदार्थ किंवा पौष्टिक पदार्थ त्यांना मिळावं. म्हणूनच सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा मेनू प्रत्येक दिवसासाठी वेगळा ठेवला आहे.
CISF च्या डाएट चार्टमध्ये रोजच्या नाश्त्यात दूध, अंडी आणि केळी या तीन गोष्टींचा नक्कीच समावेश करण्यात आला आहे. हार्वर्डच्या मते शारीरिक बळासाठी दूध, अंडी आणि केळी खूप महत्त्वाची असतात. दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रोटीन असते, तर केळ्यामध्ये प्रोटीन, कार्ब्स, पोटॅशियम असते आणि अंडी खाल्ल्याने प्रथिने, लोह आणि अनेक खनिजे मिळतात.
पनीर, चिकन आणि मासे हे आरोग्यदायी आहाराचा अविभाज्य भाग आहेत. शाकाहारी आहारातील एक अतिशय आरोग्यदायी अन्न आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन डी सोबत प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए असते. याशिवाय, चिकनमध्ये विशेषतः शरीरासाठी आवश्यक पोषण आणि विशेषतः मेंदूसाठी मासे असतात.
जवानांना रात्री संतुलित आहार दिला जातो. ज्यामध्ये हंगामी फळे आणि भाज्यांचीही काळजी घेतली जाते. स्थानिक आणि हंगामी खाद्यपदार्थ ऋतूनुसार आरोग्यासाठी आवश्यक पोषण मिळतं. हे खोकला आणि सर्दी, फ्लू, उष्माघात, हायपोथर्मिया इत्यादींपासून संरक्षण करते.
भारतीय जवानांच्या शारीरिक आणि मानसिक बळाच्या मागे आहारासोबत व्यायामाचाही हात आहे. त्यांना दररोज व्यायामाची दिनचर्या पाळावी लागते, ज्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीतही आरोग्यदायी राहण्यास मदत होते.