जेव्हा सत्ताच गुन्हेगारांची ढाल होते....; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींचा राज्य सरकारवर घणाघात
रविवारी (२६ ऑक्टोबर २०२५) X वरील एका पोस्ट करत राहुल गांधींनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातील सातारा येथे लैंगिक छळ आणि बलात्कार झाल्यानंतर एका महिला डॉक्टरची आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी शोकांतिका आहे. इतरांचे दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणारा एक आशादायक डॉक्टर भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाला बळी पडला.
संस्कृती बालगुडेचा ‘कृष्ण’ अवतार सोशल मीडियावर व्हायरल, नवीन प्रोजेक्टची झलक की खास फोटोशूट?
राहुल गांधी म्हणाले, गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तीने या निष्पाप महिलेवर सर्वात घृणास्पद गुन्हा केला. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे शोषण केले. वृत्तांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनीही तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या संरक्षणाखालील गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या आहे.” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
त्याचबरोबर, “जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा आपण कोणाकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. महिला डॉक्टरच्या मृत्यूने या भाजप सरकारचा अमानवी आणि असंवेदनशील चेहरा उघडकीस आणला आहे. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत. भारतातील प्रत्येक कन्येला भीतीची नव्हे तर न्यायाची गरज आहे.”
भारतीय संघाचा पुढील सामना कधी? जाणून घ्या IND vs AUS T20 मालिकेच्या तारखा आणि वेळ, वाचा सविस्तर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर पोलिस आणि आरोग्य विभागामध्ये वादात अडकली होती. वैद्यकीय तपासणीवरून तिचा पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाला होता, त्यानंतर तिच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. आत्महत्येच्या पत्रात मृत महिलेने पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सुसाईड नोटमधील दुसरे नाव मृताच्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांचे आहे, ज्याला अटक करण्यात आली आहे.






