लॉर्ड शार्दूल ठाकूर करणार IPL 2025 मध्ये कमबॅक! प्लेयरचे नशीब फळफळले, या खेळाडूच्या जागेवर मिळाली संधी (फोटो सौजन्य - pinterest)
आयपीएलच्या १८ व्या सीजनची दणक्यात सुरुवात झाली. पहिला सामना आरसीबी (RCB) विरुद्ध केकेआर (KKR) झाला. हा सामना शनिवारी २२ मार्चला कोलकाताच्या ईडन गार्डनवर पार पडला. यात आरसीबीच्या संघाने विजय मिळवला. तर केकेआरला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आज सुपर संडेमध्ये दोन सामने रंगणार आहेत. आता लखनौ सुपर जायंट्सच्या संघामध्ये नव्या खेळाडूची एंट्री होणार आहे. अशातच आता शार्दूल ठाकूर संदर्भातील बातमी समोर येत आहे.
आता आयपीएलचा १८ वा सिझनची सुरुवात २२ मार्च रोजी होणार आहे. प्रत्येक टीमने त्यांचा संघातील खेळाडू विकत घेतले आहेत. मागील वर्षाच्या मेगा ऑक्शनमध्ये न विकला गेलेला वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचे नशीब उजळले आहे. कारण त्याला लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने जखमी वेगवान गोलंदाज मोहसीन खानच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून विकत घेतले गेले आहे. त्याला २ कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर साइन करण्यात आले आहे. या बाबतीत एलएसजी टीमने माहिती दिली आहे.
शार्दूल ठाकूर या घरघुती सीजनमध्ये शानदार कामगिरी केली होती. मात्र मागील वर्षी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला कोणी विकत घेतले नाही. या नंतर आता एलएसजी कॅम्पमध्ये सहभागी झाला होता. कारण त्यांचे अनेक गोलंदाज जखमी आहेत. ज्यात मयंक यादव, आकाश दीप, मोहसीन खान आणि आवेश खान या नावांचा समावेश आहे. शार्दुल व्यतिरिक्त शिवम मावी देखील एलएसजी संघासोबत सराव करत होता, मात्र त्याला अजूनही टीम मध्ये सामील करण्यात आलेले नाही आहे.
मोहसीन मागील डिसेंबरमध्ये विजय हजारे ट्रॉफी खेळताना जखमी झाला होता. मोहसीन आपल्या टीमच्या कॅम्पमध्ये सामील झाला, मात्र बाकी टीम सोबत विशाखापट्टणम नाही गेला. ईएसपीएन क्रिकइंफोच्या नुसार शार्दूलने आपल्या काऊंटी टीम एसेक्सला पहिले सांगितलं होत की जर त्याला आयपीएलमध्ये कोणतीही ऑफर मिळाली तर तो ती स्वीकारेल आणि या सीजनमध्ये तो काउंटीमध्ये खेळू शकणार नाही.
एलएसजी टेन्शनमध्ये
दुखापतींच्या अनेक समस्या असूनही, एलएसजी व्यवस्थापनाने यावेळी मयंक यादववर विश्वास दाखवला आहे. मयंकला ११ करोड रुपयेमध्ये रिटेन करण्यात आले आहे. परंतु, दिल्लीत जन्मलेल्या या खेळाडूला सीजनच्या किमान पहिला हाफ खेळता येणार नाही. बीसीसीआई च्या मेडिकल स्टाफ ने एलएसजीला सांगितले कि मयंक १५ एप्रिल पर्यंत ठीक होणार. पण उर्वरित दिवसांत त्याची प्रगती कशी होते हे पाहणे बाकी आहे. त्याच्या शिवाय अन्य तेज गोलंदाज आकाश दीप आणि आवेश खान या सीजनच्या पहिल्या तीन मॅच मधून बाहेर होऊ शकतात. या सगळ्या खेळाडूच्या जखमांमुळे एलएसजीचा टेन्शन वाढला आहे.