(फोटो सौजन्य:X)
क्रिकेटचे वेड अन् देशाहून भारतात कैक पटींनी पाहायला मिळते. फक्त हा खेळच नाही तर यातील खेळाडूही चाहत्यांच्या विशेष आवडीचे आहेत. अशात खेळाडूंविषयीची कोणतीही लहान गोष्ट जरी शेअर झाली तर चाहते सुखावतात आणि मजा घेऊन ती पाहू लागतात. नुकताच सोशल मीडियावर यासंबंधीत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला हे जो वेगाने व्हायरल होत आहे.
आयपीएलच्या 18 व्या सिजनची सुरुवात ईडन गार्डन्स स्टेडियमवर भव्य उद्घाटनाने झाली. या कार्यक्रमाचे संचालन बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने केले. IPL 2025 चा उद्घाटन सोहळा नेत्रदीपक होता. शाहरुख खानने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, ज्यामध्ये गायिका श्रेया घोषाल, अभिनेत्री दिशा पटानी आणि त्यानंतर गायक करण औजला यांनी त्यांचे धमाकेदार परफॉर्मन्स दाखवले. मात्र या सगळ्यात सर्वात जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे शाह रुख खानाचा विराट कोहली आणि रिंकू सिंगसोबतच डान्स. याचा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ट्रेंड करत आहे. क्रिकेटप्रेमी आपल्या क्रिकेटपटुंना असे नाचताना पाहून फार खुश झाले आहेत.
उद्घाटन समारंभात शाहरुख खानने आरसीबी आणि भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मंचावर बोलावले. केकेआरची स्फोटक फलंदाज रिंकू सिंगही स्टेजवर पोहचला. काही संभाषणानंतर शाहरुखने सर्वप्रथम रिंकू सिंगला त्याच्या कोणत्याही गाण्यावर डान्स स्टेप्स करण्यास सांगितले. रिंकूने शाहरुखच्या पठाण चित्रपटातील ‘लूट पुट गया’वर डान्स केला. यानंतर विराट कोहलीने शाहरुख खानच्या ‘झूम जो पठाण’वर गाण्यावर डान्स करून दाखवले. रिंकू आणि विराटला शाहरुख खानसोबत डान्स करताना पाहून चाहते सुखावले आणि याचा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर शेअर करू लागले.
King Khan 🤝 King Kohli
When two kings meet, the stage is bound to be set on fire 😍#TATAIPL 2025 opening ceremony graced with Bollywood and Cricket Royalty 🔥#KKRvRCB | @iamsrk | @imVkohli pic.twitter.com/9rQqWhlrmM
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
A Special @KKRiders reunion 🤗
Shah Rukh Khan 💜 Rinku Singh
A special performance to delight the #TATAIPL 2025 opening ceremony 😍#KKRvRCB | @rinkusingh235 | @iamsrk pic.twitter.com/IK0H8BdybK
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
विराट कोहली आणि रिंकू सिंगच्या डान्सचा हा व्हिडिओ इंडियन प्रीमियर लीगच्या अधिकृत @IPL एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून आता अनेकांनी यावर कमेंट्स देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एकाच फ्रेममध्ये 3 आवडत्या व्यक्ती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “छान आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे अद्वितीय आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.