(फोटो- istockphoto)
श्रीनगर: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर प्रथमच या ठिकाणी विधानसभा निवडणूक होणार आहे. तीन टप्प्यात जम्मू आणि काश्मीर विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानुसार, आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निडवणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आज पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान पार पडले आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८. १९ टक्के मतदान पार पडले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती मतदान?
अनंतनाग- ४७.६७ टक्के
डोडा- ६९.३३ टक्के
किश्तवाड़- ७७. २३ टक्के
कुलगाम- ५९. ६२ टक्के
पुलवामा- ४३. ८७ टक्के
रामबन- ६७.७१ टक्के
शोपीया – ५३ .६४ टक्के
लोकशाहीच्या या उत्सवात जम्मू-काश्मीरमधील जनता उत्साहाने सहभागी होताना पाहायला मिळाली. तरुण, महिला, वृद्ध सर्वजण मतदानासाठी मतदान केंद्रावर उपस्थित असलेले पाहायला मिळाले. मतदान केंद्रांवरील लोकांच्या रांगा हे नवीन सरकार निवडण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसून येते. निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था केली होती.
58.19% voter turnout recorded till 5 pm in the first phase of Jammu & Kashmir Assembly election, as per ECI. pic.twitter.com/l4JKrpMEI3
— ANI (@ANI) September 18, 2024
कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच केंद्रशासित प्रदेशात तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील २४ जागांवर मतदान पार पडले आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर आणि गेल्या १० वर्षांतील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. ५ ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७०रद्द केले. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले. दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यानंतर ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.