ही आहेत पहलगामच्या दहशतवाद्यांची नावं, या दोघांचे कनेक्शन थेट...
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशवादीमध्ये हल्ला झाला. हा हल्ला तीन दहशतवाद्यांनी केला. यांची ओळख पटली आहे.हे जम्मू काश्मीर पोलिसांनी हे तिघे ही लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेचे सदस्य असल्याचे सांगितले आहे. शिवाय यामध्ये दोघे जण हे पाकिस्तानचे नागरिक आहेत.
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख सुरक्षा यंत्रणांनी पटवली आहे. यामध्ये आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा. तिन्ही हल्लेखोर द टेररिस्ट फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींशी झालेल्या संभाषणाच्या आधारे एजन्सींनी हल्लेखोरांचे रेखाचित्र देखील जारी केले आहेत. सुरक्षा एजन्सींच्या मते, दहशतवाद्यांनी त्यांची खरी ओळख लपविण्यासाठी कोड नावे वापरली. त्यांची सांकेतिक नावे मुसा, युनूस आणि आसिफ आहेत.
पहलगाममध्ये २६ पर्यटकांसह २८ जणांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांना हल्लेखोरांची ओळख पटवण्यात यश आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते टीआरएफच्या दहशतवाद्यांनी त्यांची ओळख लपवण्यासाठी आणि सुरक्षा एजन्सींची दिशाभूल करण्यासाठी या नावांचा वापर केला. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा हे पूर्वी पुंछ परिसरात सक्रिय होते आणि त्यांनी अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.
दहशतवाद्यांकडून अशा नावांचा वापर नवीन नाही. सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या नावांचा वापर दहशतवादी नेटवर्कमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी, ओळख लपवण्यासाठी आणि ओळख लपवण्यासाठी केला जातो. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने म्हटले आहे की दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू आहे.
या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर हजारो पर्यटक काश्मीर सोडून परत जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, पर्यटकांना अशा प्रकारे परत जाताना पाहून त्यांचे मन दुखत आहे. “पहलगाम येथे काल (मंगळवार) झालेल्या दुःखद दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या पाहुण्यांना अशा प्रकारे खोऱ्यातून बाहेर पडताना पाहून दुःख झाले आहे, परंतु त्याच वेळी लोक का जाऊ इच्छितात हे आम्हाला चांगलेच समजते,” असे अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले. डीजीसीए आणि नागरी उड्डाण मंत्रालय अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्था करण्यासाठी काम करत आहेत. श्रीनगर आणि जम्मू दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ एका दिशेने वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.