संग्रहित फोटो
बारामती : जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडत आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना महाराष्ट्रातील गेलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. यावरुन आता मत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
भरणे म्हणाले, आतापर्यंत २६ मृत्यू झाल्याचा अंदाज होता तो वाढेल. यात २६ लोकांना प्राण गमवावे लागले. यात मुंबईतील चार आणि पुण्यातील दोघेजण आहेत. या घटनेचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे. असे जे काही या देशात दहशतवादी असतील, त्यांचा कुठेतरी शोध घेऊन त्यांचा कायमचा बीमोड करावा, अशी मागणी भरणे यांनी केली.
पुढे बोलताना भरणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या बाबतीत बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. येणाऱ्या काळात भारत सरकार अतिरेक्यांच्या कारवाईच्या बाबतीत कडक कारवाई करेल. अशा पद्धतीच्या घटना भविष्यात होणार नाहीत याची केंद्र आणि राज्य सरकार काळजी घेईल. अडकलेल्या नागरिकांना सुखरूप आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन तिकडे आहेत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क सुरू आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.