समृद्धी महामार्गावर नेहमी अपघात होताना दिसतात. शुक्रवारी रात्री वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातात तिघांनी आपला जीव गमावला होता. आता शनिवारी देखील पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगरच्या दौलताबादजवळ एक भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. राहुल आंनद निकम (वय,47) शिवाजी वामनराव थोरात (वय, 58) आणि अण्ण रामराव मालोदे (वय, 71) अशी मृतांची नावं आहेत. हे तीन्ही प्रवासी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी होते
[read_also content=”अखेर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर; मोटरमनच्या ‘अघोषित आंदोलना’ मुळे प्रवाशांचे झाले होते हाल! https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-central-railway-resumes-as-its-affected-due-to-less-employee-at-work-nrps-506019.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. संभाजीनगरहून नाशिकच्या दिशेनं जाणारी कार (एमएच 20 ईई 745) समृद्धी महामार्गावर दौलताबादहून जाती होती. यावेळी रात्री 11 च्या सुमारास दौलताबादजवळील माळीवाडा इंटरचेंजजवळ त्यांच्या कारने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यांचा कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. तर कारमधील तिघांचा मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावरील दौलताबादजवळ अपघाता झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघात ग्रस्त झालेल्या कारमधुन जखमींना बाहेर काढुन नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण कारधील तीघांचा घटनस्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवत शासकीय घाटी रुग्णालयात पाठवले. तसेच यावेळी वाहतूक कोंडी देखील झाली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक गणेश गिरी, उपनिरीक्षक विनोद भालेराव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त कार क्रेनच्या साह्याने दूर करून वाहतूक सुरळीत केली. याबाबत पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.