भारतात धार्मिक पर्यटनाला फार महत्त्व दिलं जातं. यासाठी देशात शेकडो मंदिरं देखील बांधण्यात आली आहेत, जिथे जाऊन भाविक देवाचे दर्शन घेतात. प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर भाविकांना खास प्रसादाचे किंवा भंडाऱ्याचे वाटप केले जाते. हा प्रसाद फार शुभ मानला जातो, ज्यामुळे मंदिरातील प्रसाद खाणे कुणीही चुकवत नाही. कुठे लाडू वाटला जातो तर कुठे नारळ... पण आज आम्ही तुम्हाला देशातील काही अशा मंदिरांची माहिती सांगत आहोत जिथे प्रसादामध्ये चक्क मांसाहाराचे वाटप केले जाते.
भारतातील असे अनोखे 5 मंदिर जिथे प्रसादात भक्तांना दिल जातं नॉन-व्हेज! एका ठिकाणी लागतो बिर्याणीचा भंडारा
सर्वात जुन्या शक्तीपिठांपैकी असलेले कामाख्या मंदिर देवी सतीला समर्पित आहे. हे मंदिर आसाममधील गुवाहाटी येथे नीलांचल पर्वतावर वसले असून इथे देवीला बकरीचे मांस अर्पण केले जाते, जे नंतर प्रसाद म्हणून वाटले जाते.
यादितील दुसरे नाव म्हणजे कालीघाट मंदिर जे कोलकात्यातील एक महत्त्वाचे शक्तीपीठ आहे. हे मंदिर आदिगंगेच्या तीरावर वसलेले असून, कालीपूजेच्या काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. इथे देवीला बकरीचे मांस अर्पण केले जाते, जो तांत्रिक परंपरेचा एक भाग आहे.
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या आवारात विमला मंदिर वसले आहे, जे देवी विमला यांना समर्पित आहे. इथे देवीला मासे अर्पण केले जातात, जे नंतर प्रसादाच्या स्वरुपात वाटले जातात
भगवान मुथप्पन यांना समर्पित असलेले पारसनीकक कावु मंदिर पुणे जिल्ह्यातील भीमा नदीकाठी वसले आहे. येथे भाविकांकडून देवाला ताडी आणि मासे अर्पण केले जातात, जे नंतर प्रसाद म्हणून वाटले जातात
तामिळनाडूतील वडाक्कमपट्टी येथे मुनियांदी स्वामी मंदिर आहे जिथे वार्षिक उत्सवादरम्यान भाविकांना प्रसाद म्हणून बिर्याणीचे वाटप केले जाते.