मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे सध्या राजकीय वर्तुळात विवीध चर्चांना उधाण आलं आहे. मिलींद नार्वेकर यांनी सामना या वृत्तपत्रत दिलेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स म्हटल्याने या चर्चा सुरु आहेत.
लहान भावाबद्दल सामनात आलेल्या जाहिरातीबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी “कशासाठी ही उपमा दिली तेच मीही बघतोय. मी स्वत:च यामुळे बुचकळ्यात पडलोय.” अशी प्रतिक्रीया दिली आहे.
त्यामुळे, राजकारणापासून नेहमीच दोन हात लांब असलेल्या तेजस ठाकरे यांना व्हिव्हियन रिचर्ड्सची का दिली? असा प्रश्न मिलींद नार्वेकर यांना विचारला असाता त्यांनी “तेजस ठाकरे यांची सडेतोड आणि स्पष्ट वृत्ती आहे. त्यामुळे त्यांना विव्हियन रिजर्ड्सची उपमा दिली. या जाहिरातीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. युवा सेना अध्यक्ष पदाशीही काहीही संबंध नाही. मी कुटुंब म्हणून आणि तेजसच्या स्वभावाला धरून म्हटलेलं आहे” असं एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटलं आहे.