सौजन्य - ICC कानपूर टेस्ट हरल्यानंतर बांगलादेश कर्णधाराचा बहाणा; फलंदाजांवर फोडले खापर
Najmul Hossain Shanto Reaction : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरमध्ये खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला. पावसामुळे सामन्याचे जवळपास अडीच दिवस वाया गेले, तरीही रोहित ब्रिगेडने बाजी मारली. कानपूरमध्ये भारताविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने बांगलादेशच्या पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडल्याचे दिसून आले. शांतोने असे विधान केले की जणू तो केवळ निमित्त शोधत होता.
फलंदाज ठरले अपयशी
शांतो म्हणाला की, खराब फलंदाजीमुळे बांगलादेशने दोन्ही कसोटी गमावल्या. अश्विन आणि जडेजाचे उदाहरण देत बांगलादेशच्या कर्णधाराने चेन्नई कसोटीत निर्णायक वेळी दोन्ही फलंदाजांनी कशी शानदार भागीदारी रचली हे स्पष्ट केले.
दोन्ही कसोटीत भारताची चांगली फलंदाजी
सामन्यानंतर नजमुल हुसेन शांतो म्हणाला, आम्ही दोन्ही कसोटीत चांगली फलंदाजी केली नाही. या परिस्थितीत आम्हाला फक्त चांगली फलंदाजी करायची आहे. जर तुम्ही आमच्या फलंदाजांवर नजर टाकली तर आम्ही 30-40 चेंडू खेळलो आणि आऊट झालो.” त्यावेळी अश्विन आणि जडेजाने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्या भागीदारीने आमच्याकडून सामना हिरावून घेतला, ते चांगलेच झाले.
यशस्वी जयस्वालने केला चमत्कार, सामनावीर ठरला.
यशस्वी जैस्वालने कानपूर कसोटीत भारतासाठी दोन्ही डावात अर्धशतके झळकावली, ज्यासाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. जयस्वालच्या बाजूने दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या डावात भारतीय फलंदाजाने 51 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. याशिवाय दुसऱ्या डावात जैस्वालने 45 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या.