मुंबई : मुलीला जन्म दिल्यानंतर अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt )कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिचे फॅन्स तिची आणि तिच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी खूप आतूर आहेत. नुकतचं आई झाल्यानंतर आलिया भट पहिल्यांदाच बाहेर दिसली. बहीण शाहीनचा वाढदिवस होता. या निमित्ताने तीने आईसोबत बहिणीच्या घरी जात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील ग्लो स्पष्ट दिसत होता.
[read_also content=”‘मंकीपॉक्स’ आजार आता MPOX नवानं ओळखलं जाणार, WHO ची घोषणा https://www.navarashtra.com/world/who-renames-monkeypox-as-mpox-nrps-349341.html”]
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये आलिया तिची आई सोनी राजदानसोबत दिसली.मात्र, मुलगी राहा त्यांच्यासोबत दिसली नाही. आलिया ब्लॅक टॉप, श्रग आणि वाइड लेग बॉटम वेअरमध्ये दिसली. तिचा लूक खूप साधा आणि कॅज्युअल होता. आई झाल्यांतर तिच्या चेहऱ्यावरची चमक अचूनकपणे कॅमेऱ्यात टिपली गेली. तर, यावेळी तिची आई सोनी राजदान ब्लॅक मॅक्सी आउटफिटमध्ये दिसली. यावेळी आलियाने पापाराझींसमोर पोज दिली आणि त्यांच्याशी संवादही साधला. पापाराझीने आई झाल्याबद्दल तिचे अभिनंदन केले आणि म्हटले- ‘मुलीचे नाव चांगले आहे. यावर आलिया म्हणाली खूप चांगले नाव आहे.’ दरम्यान तिने निघताना पापाराझींनी केक खाल्ला की याची चौकशीही केली. पोज दिल्यानंतर दोघेही कारमध्ये जाताना दिसले. मात्र, या काळात राहा त्याच्यासोबत दिसला नाही.
आलिया भट्टने ६ नोव्हेंबरला मुलीला जन्म दिला. तिचं नाव राहा ठेवण्यात आलं आहे. सध्या आलिया आणि रणबीरदोघेही त्यांच्या आयुष्यातील खास क्षण एन्जॉय करत आहेत. दुसरीकडे, सोशल मीडियावर यूजर्स जोडप्याच्या बाळाच्या फोटोची वाट पाहत आहेत. आता याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. लवकरच आलिया आणि रणबीर चाहत्यांची ही प्रतीक्षा संपवणार आहेत. रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर लवकरच त्याची मुलगी राहा हिचा फोटो सोशल मीडियावर शेयर करणार आहे.