आप्तकालीन परिस्थितीत शक्य तेवढ्या लवकर लोकांची मदत करता यावी या उद्देशाने एअर टॅक्सी (America Air Taxi) तयार करण्या योजना अनेक देश आखत होते. बलाढ्य देश अमेरिकेनं ही कल्पना अस्तित्वात आणली असून अमेरिकेच्या हवाई दलाला पहिल्यया इलेक्ट्रिक एअर टॅक्सीचं आगमन झालं आहे. कॅलिफोर्नियाच्या जॉबी एरोस्पेसने कंपनीने अमेरिकेच्या एअर फोर्सला ही इलेक्ट्रिक एअर टॅक्सी दिली आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने हवाई दलाच्या AFWERX कार्यक्रमांतर्गत एक करार केला असून नासाकडून या वाहनाची चाचणी करण्यात येणार आहे.
[read_also content=”आयआयटी मुंबईमध्ये नवीन नियम! वसतिगृहाच्या मेसमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी आता स्वतंत्र जागा https://www.navarashtra.com/latest-news/separate-space-for-vegetarian-people-in-iit-mumbai-nrps-463430.html”]
शहरात वाढत्या रहदारीच्या समस्या, वाहतूक व्यवस्थेतील बिघाड, विलंब आणि परिणामी प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याने, हवाई टॅक्सी हा स्थानिक प्रवासासाठी आणि उपनगरांना शहरी केंद्रांशी जोडणारा एक पर्याय म्हणून ओळखला जात आहे. एअर टॅक्सी म्हणजे एक उडणारी कार, एक प्रकारचं लहान उड्डाणं करण्यासाठी हेलिकॉप्टर आहे. गजबजलेले रस्ते असलेल्या शहरी केंद्रांमध्ये प्रवासासाठी हे पर्याय मानले जाते आणि याला अर्बन एअर मोबिलिटी (UAM) वाहन देखील म्हटले जाते. कॅलिफोर्नियास्थित जॉबी एव्हिएशन या कंपनीने अमेरिकेच्या हवाई दलाला पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी दिली आहे. हे एक eVTOL आहे.
नासा या एअर टॅक्सीची चाचणी करणार आहे. आता पहिली टॅक्सी अमेरिकेच्या हवाई दलाने ताब्यात घेतली आहे उड्डाण चाचणीदरम्यान नासा या उडत्या कारची कामगिरी पाहणार आहे. त्याचा वापर कुठे करता येईल याचाही शोध घेतला जात आहे. वैद्यकीय पुरवठा. जंगलातील आग विझवणे. आपत्कालीन सेवांमध्ये. सोबतच्या डेटाच्या मदतीने मॉडेलिंग आणि सिम्युलेशन भविष्यासाठी नवीन विमाने आणि उडत्या कार तयार करतील.