फोटो सौजन्य - Social Media
विज्ञान व तंत्रज्ञानात रस असलेल्या तरुण विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेकडून (DRDO) अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार डिप्लोमा व ITI अप्रेंटिस पदांसाठी एकूण 20 जागा उपलब्ध असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही संधी नक्कीच गमावू नये. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी DRDO ची अधिकृत वेबसाइट www.drdo.gov.in वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
या भरतीमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये पूर्ण केलेला डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर ITI अप्रेंटिससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संबंधित ट्रेडमध्ये पूर्ण झालेले वोकेशनल कोर्सचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. या दोन्ही प्रकारच्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करणं अनिवार्य असून, उमेदवारांकडे सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रतदेखील उपलब्ध असावी.
वयाच्या अटीबाबत बोलायचं झालं, तर उमेदवाराचे वय अर्ज करताना किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. मात्र अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग आणि दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
ही अप्रेंटिसशिप एक वर्षाची असेल. उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार व दस्तऐवज पडताळणीच्या आधारे होणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे:
DRDO मध्ये अप्रेंटिस म्हणून काम करणे ही प्रत्येक विज्ञानप्रेमी विद्यार्थ्याची स्वप्नसंपन्न संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून आपले भविष्य सुरक्षित करावे. अधिक माहितीसाठी अधिकृत DRDO संकेतस्थळाला भेट द्या.