सौजन्य - बांलादेश क्रिकेट
PAK vs BAN Test Match : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्टपासून रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 6 बाद 448 धावा करून डाव घोषित केला. ही धावसंख्या बांगलादेशसाठी पुरेशी ठरेल, असे वाटत होते. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. बांगलादेशचा फलंदाज मुशफिकुर रहीमचा पाकिस्तानला सर्वाधिक फटका बसला. ज्याचे द्विशतक अवघ्या 9 धावांनी हुकले.
मुशफिकुर रहीमच्या धमाकेदार खेळीने पाकिस्तानी गोलंदाजांच्या मनात भरली धास्ती
Mushfiqur Rahim missed the double hundred by nine runs. A valiant effort and a truly remarkable innings.👏
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/A7o89axuds
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 24, 2024
मुशफिकुर रहीमने पाकिस्तानच्या गोलंदाजांता घाम काढला
पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने ज्या पद्धतीने फलंदाजी केली. त्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. रहिमने पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलेच पराभूत केले. त्यांच्यासमोर पाकिस्तानी गोलंदाज झगडत होते. 341 चेंडूंचा सामना करताना मुशफिकुर रहीमने 56.01 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 191 धावांची शानदार खेळी खेळली.
त्याच्या खेळीत 22 चौकार आणि 1 षटकारही समाविष्ट होता. मात्र, त्याचे द्विशतक झळकावता आले नाही. त्याला सैम अयुबने बाद केले. रहीमशिवाय शादमान इस्लामने ९३ धावांची चांगली खेळी केली. मेहदी हसन मिराजनेही ७७ धावा केल्या. लिटन दास (56) आणि मोमिनुल हक (50) यांनीही अर्धशतके झळकावली.
दमदार खेळी अन् पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा
Bangladesh posts their highest-ever total against Pakistan, piling up a massive 565 runs before being bowled out!
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/HwHYIMNELp
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 24, 2024
पहिल्या डावातही अप्रतिम फलंदाजी
पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत सामन्याची अवस्था अशीच होती बांगलादेशने पहिल्या डावातही अप्रतिम फलंदाजी केली. 167.3 षटकांत 565 धावा करून तो सर्वबाद झाला. सध्या बांगलादेशकडे 117 धावांची आघाडी आहे. येथून सामन्याचा निकाल लागणे कठीण वाटते.