नवी दिल्ली : आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा झटका बसला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने मेगा लिलावात परिपूर्ण संघ बनवण्यासाठी कठोर परिश्रम केले होते आणि त्यांच्या संघात एकापेक्षा जास्त खेळाडू घेतले होते. पण आयपीएल सुरू होण्यापूर्वीच ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाला नशिबाने दगा दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या घातक गोलंदाजाला या आयपीएलमध्ये खेळणे कठीण जात आहे.
दिल्लीचा संघ गेल्या दोन सत्रांपासून आपल्या गोलंदाजीवर सर्वाधिक अवलंबून आहे. संघाने अनेक सामने गोलंदाजांनी स्वबळावर जिंकले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया हा दिल्लीच्या गोलंदाजीतील सर्वात मजबूत दुवा मानला जातो. नोरखियाने गेल्या दोन वर्षांपासून आपल्या वेगाने चांगल्या फलंदाजांना हैराण केले आहे. परंतु ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, एनरिक नोरखिया आगामी हंगामातून बाहेर असू शकतात. नॉर्खियाला दीर्घकाळ दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग बनता आलेला नाही.
एनरिक नॉर्खिया हिपच्या दुखापतीशी झुंज देत आहे. दुखापतीमुळे तो नोव्हेंबरपासून फारशी गोलंदाजी करू शकलेला नाही. लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने राखून ठेवलेल्या चार खेळाडूंपैकी नॉर्खिया एक आहे. दिल्लीने६.५० कोटी देऊन नोरखियाला आपल्या टीमसोबत जोडले होते. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघातही स्थान मिळालेले नाही. जर नोरखिया आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला तर दिल्ली कॅपिटल्ससाठी हा मोठा धक्का असेल.