दहिवडी : मागील एक ते दीड महिन्यापासून माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी, आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी संपून शनिवारी (दि. ७) मतदान प्रक्रिया पार पडली आणि ८ ऑगस्टला निकाल जाहीर झाला. माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने १७ पैकी १० जागा मिळवून सत्ता कायम राखली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आघाडीला ७ जागा मिळाल्या.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातून विजयी
१) जगदाळे सूर्याजी विश्वासराव, 306 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी
२) बनगर अर्जुन आगतराव, 306 भाजप व रासप
३) देशमुख विलास आबा, 301 भाजप व रासप
४) सस्ते दत्तात्रय पांडुरंग, 287 भाजप व रासप
५) यादव रमेश दगडू, 285 भाजप व रासप
६) कदम रामचंद्र गणपती, 284 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी
७) भोसले कुंडलिक दादासो, 283 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी
सोसायटी मतदारसंघ महिला राखीव
१) जाधव निर्मला नंदकुमार, 314 भाजप व रासप
2) वीरकर वैशाली बाबासो, 302 भाजप व रासप
सोसायटी मतदारसंघ इतर मागास प्रवर्ग
१) राऊत अमोल साहेबराव, 308 भाजप व रासप
सोसायटी मतदारसंघ विमुक्त जाती-जमाती
१) झिमल रामचंद्र श्रीरंग, 306 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी
ग्रामपंचायत मतदारसंघातून विजयी उमेदवार
१) काळे बाळकृष्ण किसन, 420 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी
२) योगेश महादेव भोसले, 366 राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडी
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती
१) तुपे रविंद्र पोपट, 371 भाजप व रासप
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल
१) पुकळे ब्रह्मदेव तुकाराम, 385 भाजप व रासप
व्यापारी मतदारसंघ विजयी उमेदवार
१) किसन चंद्रोजी सावंत, 195 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी
२) शेखर मोतीलाल गांधी, 153 भाजप
सोसायटी मतदारसंघ यामधून एका विजयी उमेदवाराला २८३ मतं मिळाले व पराभूत उमेदवाराला २८१ मते मिळाली. त्यामुळे फेरमत मोजणीची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्ष पुरस्कृत शेतकरी – सहकार पॅनेलने सत्ता स्थापन केली आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने १७ पैकी १० जागा मिळवून आपली सत्ता कायम राखली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशुमख, काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख व अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या महाविकास आघाडीला ७ जागावर समाधान मानावे लागले.
शेखर गोरे यांच्या शिवसेनेच्या पॅनेलला मात्र पराभवाला समोर जावं लागलं. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.